शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
2
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
3
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
4
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
5
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
6
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
7
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
8
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
9
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
10
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
11
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
12
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
13
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
14
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
15
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
16
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
17
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
18
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
19
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
20
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:52 IST

शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी बीबीका मकबरा परिसरातील आइने महालातझाले.या कार्यक्रमाला मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातेमा झकेरिया, माजी संचालक डॉ. ए. जी. खान, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एन. एस. वाठोरे, पुरातत्व अधीक्षक डॉ. दिलीप कुमार खमारी, उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, मुख्य अभियंता आनंद तीर्थ, एन. सी. एच. पेडिंटलू, डॉ. टी. आर. पाटील, अण्णासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. खमारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आपण स्मारकांची जपणूक केली पाहिजे, या हेतूनेच या पंधरवड्याला ‘वात्सल्य-विरासत’ नाव देण्यात आल्याचे ते म्हणाले. विभागामार्फ त राबविल्या जाणाºया विविध कार्यक्रमांची माहिती डॉ. वाजपेयी यांनी दिली.स्वच्छता पंधरवड्याबाबत त्यांनी माहिती दिली. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवायोजना समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राचार्य वाठोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या रासेयोतील विद्यार्थ्यांच्या गटाने मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कालिका महिला बचत गटाच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांचा झकेरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी एम. आर. शेख, विजय सातभाई, विलीश रामटेके, नीलेश सोनवणे, ए. के. तुरे, नितू बित्रे यांच्यासह कर्मचाºयांची उपस्थिती होती. सहायक पुरातत्वज्ञ डॉ. किशोर चलवादी, रत्नेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.