औरंगाबाद : समर्पित वृत्ती, रुग्णांसाठी उपलब्ध असणे आणि उच्चतम ध्येयवाद यांच्या उत्तम समन्वयाने वैद्यकीय क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या महिला डॉक्टरांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान केला जाणार आहे. ‘लोकमत आरोग्यदीप’ पुरस्कार प्रदान करून या महिला डॉक्टरांचा जागतिक आरोग्यदिनी गुरुवारी (दि.७) गौरव केला जाणार आहे. ‘लोकमत भवन’मध्ये दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल.वैद्यकीय क्षेत्र हे प्रामुख्याने पुरुष डॉक्टरांच्या मक्तेदारीचे क्षेत्र समजले जाते; परंतु पुरुष डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवेत तेवढेच तोलामोलाचे योगदान महिला डॉक्टरही देत असतात. अशा महिला डॉक्टरांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान ‘लोकमत’तर्फे करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिला डॉक्टरांचा ‘लोकमत आरोग्यदीप’ पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. चाटे एज्युकेशन ग्रुप ‘लोकमत आरोग्यदीप’ पुरस्काराचा सहप्रायोजक आहे. गिरिकंद हॉलिडेज आणि देवगिरी महानंद दूध हे सहयोगी प्रायोजक आहेत. ‘लोकमत सखी मंच’ फोरम पार्टनर आहे. शहरातील महिला डॉक्टरांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘लोकमत’ करणार महिला डॉक्टरांचा सन्मान
By admin | Updated: April 6, 2016 01:26 IST