शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उतरत्या क्रमाने, नवीन पद्धतीनुसार पडणार छत्रपती संभाजीनगर मनपा प्रभागात आरक्षण!

By मुजीब देवणीकर | Updated: October 29, 2025 16:55 IST

निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले २६ पानांचे मार्गदर्शन पत्र

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूकीचा बिगुल यापूर्वीच वाजला आहे. हळूहळू निवडणुकीची प्रक्रिया पुढे नेण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. ११ नोव्हेंबर रोजी शहरातील २९ प्रभागांत आरक्षण टाकण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी आयोगाने महापालिकेला २६ पानांचे मार्गदर्शन करणारे पत्र पाठविले असून, त्यात उतरत्या क्रमाने आणि नवीन पद्धतीनुसार आरक्षण पडणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आरक्षणाची मानसिक तयारी ठेवत उमेदवारांनी जोर-बैठकांना सुरुवात केली आहे.

२०१५ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. २०२० मध्ये निवडणूक अपेक्षित होती. मात्र, ती लांबत गेली. पाच वर्षे उलटले तरी निवडणूक होत नसल्याने इच्छुकांनी आशाच सोडून दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले. त्यानंतर यंत्रणा जोमाने कामाला लागली. अगोदर ११५ नगरसेवक निवडण्यासाठी २९ प्रभाग तयार करण्यात आले. त्यावर सूचना हरकती घेऊन प्रभाग अंतिम केले. ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आयोगाने ही तारीखही निश्चित केली. ११ नाेव्हेंबर रोजी आरक्षण सोडत निघेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११५ नगरसेवकांमध्ये ५० टक्के आरक्षण टाकण्यासाठी अगोदर आयोगाची सदस्य संख्येला मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर उतरत्या क्रमाने एस.टी. आणि एससी प्रवर्गासाठी थेट आरक्षण पडेल. त्यातील महिलांसाठी सोडत काढली जाईल. ओबीसी प्रवर्गासाठीही आरक्षण सोडतीचा आधार घेतला जाणार आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक जिथे असेल तेथून उतरत्या क्रमाने आरक्षण पडेल, असेही आयोगाने म्हटले आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षण

प्रवर्ग----जागाओबीसी-३१

महिला-१६...........................

एस.टी. - २महिला-०१

..............................एससी -२२

महिला-११....................................

सर्वसाधारण महिला- ३०.........................................

एकूण ५५ जागा आरक्षित..............................................

प्रभागावर आरक्षण नंतर क्रमांकसोडत काढताना प्रभागावर आरक्षण पडेल. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक १५ सोडत काढल्यानंतर अ, ब, क, ड असा उल्लेख करून ज्या प्रवर्गासाठी आरक्षण काढले ते अ, ब प्रवर्गात जाईल, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वी संबधित वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होता, याचा संदर्भ गृहीत धरला जाणार नाही. आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यासाठी ही निवडणूक पहिली असे गृहीत धरले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : New Reservation System for Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar municipal elections approach with a new reservation system. The upcoming lottery on November 11th will determine ward reservations using a descending order method. This has increased anticipation among candidates preparing for the polls.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024