लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व नागरिकांना अडचणीतून सोडविण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, उपलब्ध असलेले पाणीसाठे राखीव करावेत तसेच १५ आॅगस्टपर्यंत वाट बघून नांदेड शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा, असे आदेश पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी दिले़पालकमंत्री खोतकर यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. विष्णूपुरीसह अन्य प्रकल्पांतील पाण्याचा साठा अत्यंत कमी झाला आहे़ येणाºया काळात निर्माण होणारी पाणीटंचाई तसेच शेतकºयांना येणाºया अडचणींबाबत प्रशासनाने सतर्क रहावे़ ग्रामीण भागातील शेतकरी तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविताना मंडळ अधिकारी, तलाठी तसेच तहसीलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनेदेखील सतर्कता बाळगावी, अशी सूचनाही त्यांनी केली.जिल्ह्यात असलेले पाण्याचे साठे तसेच तलावातील पाणी, छोटे व मध्यम प्रकल्प यांचे पाण्याचे आरक्षण आजपासूनच करण्याची गरज आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पात केवळ १५ टक्के साठा राहिल्याने १५ आॅगस्टपर्यंत वाट बघून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले़बैठकीला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी उपस्थित होते.
‘पाणीसाठ्यांचे आरक्षण करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:19 IST