शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाच्या रणांगणासाठी ३ फेब्रुवारीला आरक्षण सोडत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 19:57 IST

४ फेब्रुवारीला प्रारूप वॉर्ड रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होणार 

ठळक मुद्देवॉर्डांचे आरक्षण जाहीर होणार इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला बहुतांश वॉर्डांची सीमा बदल होण्याची शक्यता 

औरंगाबाद : महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणूक रणांगणासाठी ३ फेब्रुवारीला इतर मागासवर्ग व महिला प्रवर्गासाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत. ४ फेब्रुवारीला प्रारूप वॉर्ड रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप वॉर्ड रचनेवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे. 

महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा केल्यानंतर आयोगाने आरक्षण सोडतीची तारीख कळविली आहे. ३ फेब्रुवारीला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी असलेल्या राखीव वॉर्डांची सोडत काढली जाणार आहे. ४ फेब्रुवारीला प्रारूप वॉर्ड रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्यावर ११ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सोडत काढण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०२० मध्ये होणे संभाव्य असून, १८ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय प्रभाग पाडून सोडतीचा कार्यक्रम ठरला होता. मात्र राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुसदस्यीय पद्धती रद्द करून पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धत लागू करण्याचे निर्णय घेतला. त्यामुळे  महापालिका प्रशासनाने पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने रचना करून प्रस्ताव अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्या समितीकडे पाठविला. तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. दरम्यान आयोगाकडून सोडतीबाबत पत्र न आल्याने विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुकांची धाकधूक वाढत चालली होती.

बहुतांश वॉर्डांची सीमा बदल होण्याची शक्यता महापालिकेच्या २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ११५ वॉर्ड होते. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी ११५ वॉर्डच असतील. मात्र बहुतांश वॉर्डांच्या सीमा बदलण्याची शक्यता आहे. सातारा, देवळाई भागात दोन वॉर्ड असून, लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या इतर वॉर्डात समप्रमाणात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर वॉर्डांच्या सीमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतरच वॉर्ड सीमांमधील बदल समोर येईल.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक