शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:33 IST

निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून, प्रारूप मतदार याद्यांच्या कामाला गती आली आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी, त्यानंतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही, असे  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, मतदारांना स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मतदार स्थलांतरित झाले तर ते बेकायदेशीर नाही; परंतु मोठ्या संख्येने जर तो आकडा असेल, तर त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी आक्षेप घेतला, तर प्रशासन कारवाई करील. मतदार याद्या अंतिम करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. याद्यांमध्ये तेथेच घोळ होतो, असे पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाधिकारी म्हणाले, त्यासाठीच ३१ आॅक्टोबरची मुदत आक्षेपासाठी आहे. १ सप्टेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 

एप्रिलमध्ये निवडणूक पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची तारीख निश्चित नाही. ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रशिक्षण पार पडले. २ हजार ९५७ मतदान केंद्रांसाठी ५७४३ मतदान युनिट आणि ३ हजार ७३९ नियंत्रण युनिट जिल्ह्यात असतील. बेल या कंपनीचे अभियंते ते यंत्र तपासून सील करतील. ही प्रक्रिया सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींसाठी पाहता येईल. २५ दिवस हा कार्यक्रम इन कॅमेरा असेल. यानंतर यंत्र सील केल्यावर, मतदारसंघात गेल्यावर ईआरओ तपासतील. त्यामुळे यंत्रांणा छेडछाड होणार नाही. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबाद