शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे

By विकास राऊत | Updated: July 4, 2023 12:21 IST

आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. बळीराजा सर्व्हेअंतर्गत तो सर्व्हे असून, हा प्रश्न पूर्णपणे धसास लावणारच, असे मत केंद्रेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

त्या सर्व्हेचे विश्लेषण पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख शेतकऱ्यांना देण्याची सूचना सरकारला करण्याचे वक्तव्य केंद्रेकर यांनी १६ मे रोजी केले होते. त्यानंतर, त्यांनी २४ मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. तो शासनाने मंजूर केल्यानंतर, ३ जुलै रोजी केंद्रेकर यांनी पदभार सोडला. आयुक्तालयातून केंद्रेकर सपत्नीक विनावाहन पायी गुलशन महलपर्यंत गेले. सोबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, महसूल उपायुक्त पराग सोमण आदी अधिकाऱ्यांचा लवाजमाही पायीच निघाला. आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. दिवसभरात अनेक सनदी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

पुढच्या आठवड्यात अहवाल शासनाकडे...कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेअभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पूर्ण झाला असून, अंतिम निष्कर्षासह शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्याचा अहवाल पुढच्या आठवड्यात शासनाकडे देण्यात येणार आहे.

सर्व्हेमधून काय दिसले?शेतकऱ्यांची मानसिकता कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज आला आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कर्ज आहे. याचे विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येईल.

असा केला सर्व्हे.....बारा विभागातील १०४ प्रश्नांची माहिती भरून घेतली आहे. आत्महत्येचा विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी आहे. शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्ज, कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या इ. प्रश्नांची माहिती संकलित करण्यात आली.

शेती, पर्यावरणात रमणार- केंद्रेकरशेती, शेतकरी पर्यावरणात रमणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. नोकरीमुळे जगायचे राहून गेले आहे. एकच मुलगा असून, तो मोठा होऊन परदेशात कधी गेला, हे समजलेही नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. वाचन, चित्रकला, भटकंती, निसर्गाच्या सान्निध्यात पुढील काळ घालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी