शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...शिक्षणाधिकारी जैस्वाल यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:50 IST

खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.

औरंगाबाद : बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करू नयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांचीबदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.

बदलीमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांची बैठक शनिवारी औरंगाबाद शिक्षक सोसायटी कार्यालयात झाली. या बैठकीत शिक्षकांनी केलेल्या आरोपांचे खंडण करताना शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली झालेल्या शिक्षकांची एवढी मोठी संख्या असून कोणाकोणाची प्रमाणपत्रे तपासायची. बिनबुडाचे आरोप न करता आमच्याकडे थेट नावानिशी तक्रार द्या, त्याची विनाविलंब चौकशी करू व दोषी आढळल्यास, त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करू. 

मराठवाडा शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेकडो शिक्षकांनी बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गा-हाणे मांडले. पती-पत्नी शिक्षक, कनिष्ठ शिक्षक तसेच एकल शिक्षकांवर अन्याय झाले आहेत. संवर्ग- १ व संवर्ग- २ मध्ये अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून, तर अनेकांनी चुकीचे अंतर दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. बदली करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात आलेली नाही, असे आरोप पुराव्यासह शिक्षकांनी केले. 

बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करासंवर्ग- १, २ व ३ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांची शारीरिक चाचणी मेडिकल बोर्डामार्फत करावी. संवर्ग- २ मध्ये पती-पत्नी शिक्षकांच्या शाळांचे अंतर ३० किमीपेक्षा कमी असताना ते जास्त दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. याची सत्यता पडताळावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. चुकीच्या बदल्या त्वरित रद्द कराव्यात व त्यांच्या ठिकाणी विस्थापित शिक्षकांची बदली करण्यात यावी, कायमस्वरूपी रिक्त ठेवलेल्या जागा विस्थापित शिक्षकांना देण्यात याव्यात, या मुद्यांवर शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTransferबदलीTeacherशिक्षक