शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात विधानसभेची पुनरावृत्ती; महायुतीला भरघोस यश, सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:32 IST

शिंदेसेना, राष्ट्रवादी (अ.प.)ची दमदार कामगिरी; काँग्रेस तग धरून, उद्धवसेना, राष्ट्रवादी (श.प.)चा धुव्वा

छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले आहेत. मराठवाड्यात महायुतीने भरघोस यश मिळविले असून, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील नगराध्यक्ष पदाच्या ५२ जागांपैकी सर्वाधिक १७ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत तग धरून असल्याचे दिसते. तर उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (श.प.) चा धुव्वा उडाला आहे. राज्यात महायुती असलेल्या भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अ.प.) या तीन पक्षांनी मिळून नगराध्यक्ष पदाच्या ५२ पैकी तब्बल ३९ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अ.प.) यांनी विधानसभेप्रमाणेच याही निवडणुकीत आपली दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ११ नगराध्यक्ष पदे काबीज केली आहेत. राष्ट्रवादी (श.प.) आणि उद्धवसेनेला आपला प्रभाव दाखवता आला नाही. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचा परिणाम निकालात दिसत आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघात असलेल्या नगरपालिकांमध्ये आपला प्रभाव दाखविता आला नाही.

१७ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या भाजपने लातूर जिल्ह्यात आपला प्रभाव दाखविला आहे. लातूर जिल्ह्यात पाचपैकी भाजपचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे जवळचे असलेले आ. अभिमन्यू पवार यांना औसा नगरपरिषदेत महायुतीमधीलच राष्ट्रवादी (अ.प.) ने झटका दिला आहे.औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात मात्र भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. छत्रपती संभाजीनगरमधील सातपैकी आणि बीडमधील सहापैकी प्रत्येकी एक जागा भाजपला मिळाली आहे. हिंगोलीतील तीनपैकी एकही नगराध्यक्ष भाजपला निवडून आणता आला नाही. हिंगोली जिल्ह्यातील तीनपैकी दोन नगरपालिकांवर शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वर्चस्व स्थापित केले आहे.

धाराशिवमध्ये आठ नगरपरिषदांमध्ये महाआघाडीचा भाजप-शिंदेसेनेने धुव्वा उडविला आहे. जिल्ह्यात उद्धवसेनेचा एक खासदार व दोन आमदार असूनही उद्धवसेनेला याठिकाणी प्रभावी कामगिरी करता आली नाही.काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अनपेक्षितपणे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद आणि कन्नड या दोन जागा जिंकल्या. नांदेडमध्येही दोन जागांवर यश मिळाले.

शिंदेसेनेने ११ जागा जिंकत मराठवाड्यात उद्धवसेनेला खूपच मागे टाकले आहे. शरद पवार यांनाही प्रभाव पाडता आला नाही. परभणी जिल्ह्यातील जनसुराज्य पक्ष आणि यशवंत सेना यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तर अंबाजोगाईमध्ये अटीतटीच्या लढतीत आ. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी शहर परिवर्तन आघाडीतून विजय मिळविला आहे. नांदेड जिल्ह्यात महेश बोलमवाड यांच्या मराठवाडा जनहित पार्टीनेही धर्माबाद आणि बिलोली या दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणून धुरळा उडवून दिला आहे. यापैकी एका नगराध्यक्षाने भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.

अजित पवार यांच्या पक्षानेही ११ जागा जिंकत काकांच्या पक्षापेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. बीडमध्ये परळी आणि बीड शहरात नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (अ.प.)चे उमेदवार निवडून आले. बीडमध्ये बदल करू, असे जाहीर करणाऱ्या अजित पवारांनी शब्द खरा ठरविला. परळीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावातील एकीमुळे महायुतीचा उमेदवार सहज विजयी झाला.

प्रचाराचा परिणामराज्यात युती असलेल्या भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत अनुक्रमे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुकीत जोरदार प्रचार केला. या तिन्ही नेत्यांसह राज्य सरकारमधील मंत्र्यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला. त्याचे फलित म्हणून महायुतीला ५२ पैकी तब्बल ३९ जागा मिळाल्या.

या आमदारांना धक्काछत्रपती संभाजीनगरातील प्रशांत बंब (गंगापूर खुलताबाद-भाजप) यांना गंगापूर आणि खुलताबाद या दोन्ही ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. शिंदेसेनेच्या आमदार संजना जाधव यांच्या कन्नडमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. वैजापूरचे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या शहरात भाजपचा नगराध्यक्ष झाला. तर फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा चव्हाण आमदार असून, तिथे उद्धवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला. जालन्यात भोकरदनमध्ये भाजपचे आ. संतोष दानवे यांना धक्का बसला. तिथे राष्ट्रवादी (श.प.) चा नगराध्यक्ष झाला. परभणीच्या पाथरीत राष्ट्रवादी (अ.प.)चे आमदार राजेश विटेकर यांना नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. तिथे शिंदेसेनेने नगराध्यक्ष पदावर बाजी मारली. उस्मानाबाद विधानसभेचे उद्धवसेनेचे आ. कैलास पाटील यांनाही झटका बसला. धाराशिवमध्ये भाजपच्या उमेदवार निवडून आल्या. तर कळंब पालिकेत शिंदेसेनेने बाजी मारली. उद्धवसेनेचे आ. प्रवीण स्वामी यांना उमरगा व मुरूम नगर परिषदेत यश मिळविता आले नाही. नांदेड जिल्ह्यात भाजपचे आ. जितेश अंतापूरकर यांच्या मतदारसंघातील देगलूर, कुंडलवाडी आणि बिलोली येथे इतर पक्षांचे नगराध्यक्ष झाले. मुखेडमध्ये तुषार राठोड यांना, नायगावमध्ये राजेश पवार यांना आणि किनवटमध्ये भीमराव केराम या भाजपच्या तीन आमदारांना धक्का बसला. कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर यांना नगराध्यक्षपदी पक्षाचा कार्यकर्ता बसवता आला नाही. बीड शहरात राष्ट्रवादी (अ.प.)च्या उमेदवार निवडून आल्या. शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला. गेवराईत मात्र पक्षाचे विजयसिंह पंडित यांना धक्का बसला. तिथे भाजपच्या उमेदवार निवडून आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Municipal Elections: Mahayuti Wins Big; BJP Leads as Mayor

Web Summary : Mahayuti triumphs in Marathwada's municipal polls, mirroring assembly results. BJP secures most mayor positions. Congress shows resilience, while Uddhav Sena and NCP (SP) suffer losses. Ajit Pawar's NCP outperforms Sharad Pawar's faction.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Marathwadaमराठवाडा