शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

जिल्ह्यात कालव्यांची दुरुस्ती अडकली लालफितीत; जायकवाडीचे पाणी नाही जाणार शेतकऱ्यांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 6:30 PM

पाणी सोडण्याचा निर्णय झाला खरा; पण शेतकऱ्यांपर्यंत पाणीच जाणार नाही

ठळक मुद्देकार्यकारी संचालक, मुख्य अभियंत्यांकडे याबाबत राजकीय नेत्यांनी देखील मागणी केली आहे. चार महिन्यांपासून याबाबत काहीही निर्णय  झाला नसल्याची माहिती

- विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यातील बहुतांश कालवे गाळाने भरलेले असून, काही फुटलेले आहेत. त्यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे यंदाच्या रबी हंगामासाठी पाण्याची आर्वतने (पाणी सोडणे) मंजूर होऊन देखील शेतीपर्यंत पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यातील ११२ प्रकल्प, कालवे आणि धरणांच्या दुरुस्तीसाठी २४ ऑगस्ट रोजी पाहणी करून कडा कार्यालयाने ५५ कोटींचा सादर केलेला प्रस्ताव  लालफितीत अडकला आहे. 

कार्यकारी संचालक, मुख्य अभियंत्यांकडे याबाबत राजकीय नेत्यांनी देखील मागणी केली आहे. आता अर्धा डिसेंबर महिना लोटला आहे. चार महिन्यांपासून याबाबत काहीही निर्णय  झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व कालवे नादुरुस्त असून, गाळाने भरलेले आहेत. १० वर्षांपासून दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे यंदा धरण व इतर प्रकल्पांमध्ये पाणी असतानादेखील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधी रुपये दुरुस्तीसाठी दिले जातात. मराठवाड्यात ५० लाखांपेक्षा अधिक निधी दिला जात नाही. तसेच लोकसहभागातून कामे करावीत, अशा सूचना केल्या जातात. कालव्यांवर वर्ग- ३ वॉचमन नाहीत, चौकीदार, मोजणीदार नाहीत. कालवे फोडलेले आहेत. स्ट्रक्चर राहिलेले नाही. अशा परिस्थिती कालव्यांतून पाणी सोडण्याचा निर्णय जरी झाला असला तरी ते पाणी थेट शेतकऱ्यांना मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.  

१४३८ दलघमी पाणी देणार यंदा औरंगाबादसह मराठवाड्यात १५० टक्के  पाऊस झाल्याने सगळे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळे आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पांतून १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गेल्या महिन्यात झाला आहे. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांवरील लाभ क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे. डाव्या कालव्यातून रबी हंगामासाठी  १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांवर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. यासाठी ११४८ दलघमी पाणी वापर अपेक्षित आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरीagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प