शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : भाडेकरूंची दुकाने जाळली की जळाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:38 IST

दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, चमन चौक आणि गुलमंडीवर शेकडो दुकाने जाळण्यात आली आहे. यातील बहुतांश दुकाने अनेक वर्षांपासून पोटभाडेकरूंची आहेत. दंगलग्रस्त भागात कोणत्याही ठिकाणी सलगपणे जाळपोळ करण्यात आलेली नाही. टिपून टिपून दुकाने जाळण्यात आलेली असल्याचे एकूण सर्व जाळपोळीतून दिसून येत आहे. दंगलग्रस्त भागातील बहुतांश दुकाने ही एका गटातील मालकीची होती, तर पोटभाडेकरू दुसऱ्या गटातील आहेत. दुकाने खाली करणे, भाडे वाढविणे यातून मालक आणि पोटभाडेकरू यांच्यात सतत वाद होत होते. मात्र, पोटभाडेकरू काहीही झाले तरी दुकान खाली करत नव्हते. यातून दंगलीमध्ये पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.दुकाने खाली करण्यासाठी सुपारीया भागातील मालकांनी पोटभाडेकरूंनी दुकाने खाली करण्यासाठी सुपारी दिली असल्याचेही बोलले जात आहे. दुकाने खाली करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून काहीजण प्रयत्न करीत होते. मात्र, यात यश मिळाले नव्हते. गांधीनगरात झालेल्या वादाचा फायदा घेत या भागात दंगल भडकवली. या दंगलीचा फायदा घेत अडचण वाटणा-या पोटभाडेकरूंची दुकाने जाळण्यात आली. याविषयी सर्व माहिती पोलीस तपासात पुढे येईल, असेही काही पोटभाडेकरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :fireआगSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार