शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाचा चार्ज नको; जिल्हाधिकार्‍यांची शासनाला विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 11:53 IST

महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय कुरघोडीचा एकाच आठवड्यात जिल्हाधिकारी एन.के. राम यांना अनुभव आला असून, त्यांनी शासनाकडे मनपाचा पदभार सोडण्यासाठी विनंती केल्याची माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय कुरघोडीचा एकाच आठवड्यात जिल्हाधिकारी एन.के. राम यांना अनुभव आला असून, त्यांनी शासनाकडे मनपाचा पदभार सोडण्यासाठी विनंती केल्याची माहिती पुढे आली आहे. मनपा आयुक्तपदी शासनाने ज्यांची बदली केली आहे, त्यांनी तातडीने रुजू व्हावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनीदेखील शासनाशी संपर्क केल्याचे वृत्त आहे. 

मुळात जिल्हाधिकार्‍यांना पालिकेचा चार्जच नको होता. एका प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी जायचे होते, त्यामुळे त्यांनी शासनाकडे मनपाच्या पदभाराबाबत विनंती केली होती; परंतु शहरातील कचरा समस्येने विक्राळ रूप घेतले होते, त्यासाठी त्यांना शासनाने मनपा आयुक्तपदाची प्रभारी जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची तातडीने बदली केल्यानंतर पर्याय म्हणून जिल्हाधिकारी राम यांचे नाव पुढे आले. राम यांनी जिल्हा नियोजन समिती अनुदान विनियोग, महसूल वसुलीची कामे सांभाळून शहरातील कचर्‍याच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी नियोजन केले; परंतु कचर्‍याची विल्हेवाट १०० टक्के लागण्यासारखी परिस्थती निर्माण झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांची धावपळ सुरू आहे. मार्चअखेरीस डीपीडीसी, वसुलीच्या कामांचा व्याप आणि मनपा आयुक्त पदाची प्रभारी जबाबदारी सांभाळून ते झोननिहाय कचरा निर्मूलन आणि प्रक्रियेबाबत बैठक घेत आहेत, तसेच डम्पिंग आणि कचरा प्रक्रियेसाठी आढावा घेत आहेत. रविवारी त्यांनी पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, पुंडलिकनगर परिसरातील कचर्‍याच्या समस्येचा आढावा घेतला. ज्या परिसरात कचर्‍याची प्रक्रिया करण्यासाठी नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत, तेथील नागरिकांशी जिल्हाधिकारी संवाद साधत आहेत. 

सोशल मीडियात अनेक नावांची चर्चा पािलका आयुक्तपदी कोण येणार याबाबत, सोशल मीडियातून अनेक अधिकार्‍यांच्या नावाची चर्चा आहे; परंतु अजून तरी शासनाने आयुक्तपदाची जबाबदारी कुणाकडे द्यायची, हे निश्चित केलेले नाही. जिल्हाधिकारी राम यांचे पद मनपा आयुक्तांच्या पदापेक्षा मोठे आहे. त्यामुळे त्यांची वर्णी मनपावर लागेल, असे चित्र सध्या नाही; परंतु सगळे काही शासनाच्या हाती असल्यामुळे आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार