शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

रखेलीच्या आतेभावानेच काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:06 IST

प्रकाश कासारे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. रखेलीच्या आतेभावानेच कासारे यांचा कारमध्ये गळा आवळून खून केला. चिकलठाणा पोलिसांनी हिनानगरातून आरोपी अंकुश नामदेव तुपे (२९, रा. हिनानगर, चिकलठाणा) यास अटक केली असून, त्याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देप्रकाश कासारे याचा दाबला गळा : मारेकऱ्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : प्रकाश कासारे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. रखेलीच्या आतेभावानेच कासारे यांचा कारमध्ये गळा आवळून खून केला. चिकलठाणा पोलिसांनी हिनानगरातून आरोपी अंकुश नामदेव तुपे (२९, रा. हिनानगर, चिकलठाणा) यास अटक केली असून, त्याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी सांगितले की, प्रकाश कासारे व अंकुश तुपे हे दोघे रविवारी (दि.१०) रात्री शेंद्रा परिसरातील एका बारमध्ये सोबत दारू पिले. बारमध्ये त्यांची हुज्जत झाली होती. बारमधून बाहेर येऊन ते रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीकडे आले. तेथे कासारे लघुशंकेसाठी गाडीतून बाहेर आले. त्यांचा फोन गाडीतच होता. त्याचवेळी एका महिलेचा फोन आला. तो तुपेने उचलला. फोन कॉल घेतल्यामुळे कासारे चिडले व दोघांत शाब्दिक चकमक सुरू झाली. दोघेही गाडीत बसून भांडत असताना कासारे यांनी तुपेच्या तोंडात चापट मारली. त्या रागाने तुपेने कासारे यांचा गळा आवळला. काही वेळात कासारे निपचीत पडल्याचे पाहून आरोपी तुपेने कासारेचा मृतदेह गाडीत स्टेअरिंगसमोर बसविला आणि काढता पाय घेतला.नातेवाईकांचा घाटीत ठिय्याप्रकाश कासारे यांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचा संशय नातेवाईकांना आल्याने त्यांनी घाटीत ठिय्या दिला होता. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांच्यासोबत कोण कोण होते, याची माहिती घेतली. त्यानुसार अंकुश तुपे यास सोमवारी रात्री त्याच्या घरून पोलिसांनी उचलले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसांनी विश्वासात घेतल्याने त्याने तोंड उघडले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.‘ती’ कार वर्षभरापूर्वीच विकलेलीघटनास्थळी सापडलेली कार ही कासारे यांनी वर्षभरापूर्वीच मित्राला विकली होती. कासारे ती कार अधूनमधून घेऊन जात होते. पोलिसांनी कारमालकासही चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र, त्याला नंतर सोडून देण्यात आल्याचे समजते.दोन दिवसांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचाही रागआरोपीच्या नातेवाईक महिलेशी कासारेचे अनैतिक संबंध होते. त्या महिलेच्या आई-वडिलांना कासारे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवीगाळ केली होती. त्याचा रागही आरोपीला होता. शिवाय कासारेने तोंडात चापट मारल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने खून केला, अशी कबुली आरोपी तुपे याने दिल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्या म्हाताºया नातेवाईकांस शिवीगाळ केल्याचा राग तुपेच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने कासारे याला हॉटेलात जास्त प्रमाणात दारू पाजली होती. त्यामुळे कासारे यांना गाडीही चालविता येत नव्हती. म्हणून तुपे यानेच कंपनीपर्यंत गाडी चालवीत आणल्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.असा मिळाला ‘क्लू’कासारे यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत होते. त्यावरून पोलीस तपासाला लागले होते. कासारे यांचे एका महिलेशी संबंध असल्याची चर्चा पोलिसांच्या कानी आली. तिला शेंद्रा परिसरातच त्याने फ्लॅट घेऊन दिल्याची माहितीही समजली. त्या धाग्यावरून पोलिसांना लिंक मिळाली व पोलीस त्या महिलेपर्यंत आणि तेथून तुपेपर्यंत पोहोचले.मोबाईल व कानातील झुमका सापडलागाडीत कासारे यांचा मोबाईल आणि महिलेच्या कानातील झुमका सापडला असून, तो नेमका कुणाचा? गाडीत आणखी कुणी हजर होते काय? गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदनातून समजले; परंतु या खुनाच्या कटात अजून कोणी सहभागी होते का, याचा शोध चिकलठाणा पोलीस घेत आहेत.१६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीकासारे यांचा मारेकरी अंकुश तुपे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोळंके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस