शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी चालकाला वीजचोरीसाठी रिमोटचा वापर पडला तब्बल २ लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 13:44 IST

 महावितरणची पीठ गिरणीचालकाविरुद्ध कारवाई

ठळक मुद्देमहिला अधिकाऱ्याने एक किलो ज्वारी नेली दळायलागिरणीच्या भिंतीवर अडकविलेल्या पिशवीत लपवलेले रिमोट सापडले.

औरंगाबाद : पिठाच्या गिरणीसाठी वीज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध महावितरणने केलेल्या कारवाईत १७ हजार ८५६ युनिटची चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने गिरणीचालकाला १ लाख ९७ हजार ७४८ रुपयांचे अनुमानित बिल दिले आहे.

हडकोतील एक गिरणीचालक रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याची तक्रार सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्याकडे आली होती. डॉ. गिते यांनी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना तक्रारीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर-२ च्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास हडको एन-११ मधील शिकारे गिरणीची तपासणी केली. एन-१२ शाखेचे सहायक अभियंता मनीष अंभोरे व मीटर चाचणी कक्षाचे सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ यांनी सुरुवातीला भेट दिली तेव्हा गिरणी बंद होती.

महिला अधिकाऱ्याने एक किलो ज्वारी नेली दळायलाशहर-२ विभागाच्या कार्यकारी अभियंता निधी गौतम एक किलो ज्वारी घेऊन त्या  गिरणीमध्ये ग्राहक बनून गेल्या. गिरणीचालक सुरेश पूनम शिकारे याने  गिरणी चालू करताच गौतम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित केले. सिडकोचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल कराळे, अजय भंगाळे, सहायक अभियंता अंभोरे, सपकाळ, मुख्य तंत्रज्ञ रवींद्र गडप्पा, तंत्रज्ञ सोमाजी जाधव यांनी गिरणीवर धाड टाकली.

चोरीचे प्रात्यक्षिकही दिले गिरणीच्या भिंतीवर अडकविलेल्या पिशवीत लपवलेले रिमोट सापडले. गिरणीचालकाने रिमोटने मीटरचा डिस्पले बंद करून वीजचोरी करीत असल्याची कबुली दिली. त्याचे प्रात्यक्षिकही  दाखवले. पथकाने रिमोट व मीटर जप्त केले. महावितरणच्या प्रयोगशाळेत मीटरची तपासणी केली असता या ग्राहकाने गेल्या दोन वर्षांत १७ हजार ८५६ युनिटची वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार ग्राहकाला १.९७ लाखांचे बिल देण्यात आले. विद्युत कायद्याच्या कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादtheftचोरी