औरंगाबाद : शहरातील डिझेल रिक्षाऐवजी परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा १५ जुलैपर्यंत नोंदविण्याची मुदत आता तीन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शहरातील दोन हजार अॅपेचालकांना दिलासा मिळणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत अधिकृत निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील डिझेल रिक्षाऐवजी परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा १५ जुलैपर्यंत नोंदविण्याची सूचना डिझेल आॅटोरिक्षाचालकांना करण्यात आली आहे. यामुळे अॅपेरिक्षांवर बंदी येणार असल्याने अॅपेचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रादेशिक प्राधिकरणाच्या २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिझेल रिक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रदूषणाचे कारण दाखविण्यात आले आहे. परंतु या निर्णयामुळे अॅपेचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा नोंदविण्याची मुदत तीन महिने वाढविण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी दिली.
अॅपेचालकांना दिलासा ?
By admin | Updated: July 7, 2015 00:41 IST