शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आमचा हात धरून मोठे झालात, हे लक्षात ठेवा! शिरसाटांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:10 IST

इतका अहंकार बरा नाही. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नाही: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहेत. आम्ही काय बोलावे, काय बोलू नये, हे आम्ही पाहू. आम्ही त्यांच्यामुळेच उठाव केला आणि सत्तेत आलो, आणि ते कुणामुळे सत्तेत आले, याचाही विचार त्यांनी करावा, असा टोला पालकमंत्री तथा शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी बुधवारी लगावला.

इतका अहंकार बरा नाही. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नाही. स्थानिक पातळीवर युती हवी, असे शिवसेनेचे धोरण आहे. पण, ज्यांना युती होऊ नये, असे वाटते त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना तसे कळवावे. मात्र, जाहीर वक्तव्ये करू नये, त्याचा परिणाम मतदारांवर होतो, असेही शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले. आधी भाजप नेत्यांनी शिंदेसेनेला डिवचले, मग शिंदेसेने भाजप घमेंड करत असल्याचा टोला लगावला. पुन्हा भाजपने १९८८ च्या प्रमाणे तुमची स्थिती नसल्याची टीका केल्यानंतर बुधवारी शिरसाट यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले.

मोठा भाऊ कोण, हे वेळच ठरवेल...निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. विधानसभेत असे अनेक सर्व्हे झाले, मात्र त्यातील ८० टक्के सर्व्हे चूक निघाले. त्या आधारे राजकीय गणित बांधणे चुकीचे आहे. मात्र, पक्षाच्या परिस्थितीचा आढावा सर्व्हेतून घेतला जातो. येणाऱ्या मनपा निवडणुकीत कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ असेल, हे अजून ठरलेले नाही. आता सांगितले तर वाद होतील. सध्याचा प्राथमिक सर्व्हे असून आगामी काळात कोण, कुठे, कसे लढणार, हे स्पष्ट झाल्यावर होणाऱ्या सर्व्हेला महत्त्व असेल. सध्या फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे. त्यानुसार काही घडेल, असे मानणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे, मोठा भाऊ कोण हे निवडणुकीवेळी ठरेल. दरम्यान, वेदांतचा विषय माझ्यासाठी संपला आहे. काही जण खोदकाम करीत आहेत. त्यांनी आता काय करायचे ते करावे. असेही शिरसाट म्हणाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाट