शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:56 IST

धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती.

- सुनील घोडके

खुलताबाद : देशभरात गुरूवारी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देऊन श्रृंगार करण्यात आला होता. त्यामुळे भक्तीभावासह मंदिरातही देशभक्ती दिसली होती. 

सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने खुलताबाद चा भद्रा मारूती, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर भाविकांच्या गर्दीने फुलले असून स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गुरूवारी गर्दी केली होती. धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. 

भद्रा मारूती मूर्तीभोवती सजावट करण्यात आल्याने धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक आगळेवेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले. भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप दिले. नागवेलीचे पाने, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा कपडा, मूर्तीस शेंदूर लावलेला तो भगवा रंग अशा तिरंगा झेंड्याचे रूप देण्यात आले होते. खुलताबाद येथील हनुमान भक्तांनी ही सजावट केली.

खुलताबाद, म्हैसमाळ परिसरात गर्दीस्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनाच सुटी असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविकांनी सहकुटुंब खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ येथील धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट दिली. गर्दीने हा परिसर फुलून गेला होता. दरम्यान सांयकाळी वेरूळ घाट, दौलताबाद घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, दौलताबाद घाट, देवगिरी किल्ला परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद दरम्यान युवकांनी तिरंगा रॅली काढली होती. रिक्षा, मोटारसायकल, व चारचाकी वाहने तिरंग्याने सजली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन