शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी कामगाराला दिलासा; अनेक वर्षांनंतर मिळाला न्याय

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : पुरेसे काम उपलब्ध असूनही कामगाराला कायम सेवेचे फायदे मिळू नयेत म्हणून त्याला केवळ सात महिन्यांचे अस्थायी नियुक्तीपत्र देणे,

औरंगाबाद : पुरेसे काम उपलब्ध असूनही कामगाराला कायम सेवेचे फायदे मिळू नयेत म्हणून त्याला केवळ सात महिन्यांचे अस्थायी नियुक्तीपत्र देणे, अनुचित कामगार प्रथा असून, त्यास दोन लाख रुपये एक महिन्यात अदा करावे, असे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. औटे यांनी बजाज आॅटो कंपनीला दिले. या निर्णयाने कामगाराला दिलासा मिळाला आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीमधील बजाज आॅटो लि.कडून कामगारांना कायम सेवेचे लाभ मिळू नयेत म्हणून केवळ ७ महिने नियुक्तीचे पत्र दिले जात असे. पाच महिन्यांचा खंड दिल्यानंतर त्याच कामगारांना पुन्हा ७ महिन्यांसाठी कामावर घेतले जाई. अशा प्रकारे १९९२ ते १९९८ या कालावधीत हजारो कामगारांनी अस्थायी कामगार म्हणून कंपनीत काम केले. सुमारे १९९७ कामगारांनी औद्योगिक न्यायालयात खटले दाखल करून सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. कंपनीत पुरेसे काम उपलब्ध असताना ७ महिन्यांची नियुक्ती देणे, अनुचित कामगार प्रथा असल्याचे नमूद करीत कामगारांना कामावर ठेवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयास कंपनीने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने आदेश कायम ठेवल्याने कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये कामगारांना एकत्रित नुकसानभरपाई दिलेली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कामगारांनी कामगार आयुक्तांच्यासमोर औद्योगिक कलह कायद्यान्वये प्रकरण दाखल केले. महाराष्ट्र शासनाने ही प्रकरणे कामगार न्यायालयाकडे न्याय निवाड्यासाठी वर्ग केली आहेत. १९९८ पासून आतापर्यंत कामगार न्यायालयात या प्रकरणावर सुनावण्या सुरू आहेत. त्यातील एक अस्थायी कामगार सोमनाथ लक्ष्मण थोरात यांनीही कंपनीत काम केले होते. त्यांनी दाखल केलेल्या प्रकरणात (आय.डी.ए. ४६/२०००) कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. औटे यांनी निवाडा केला आहे. या निवाड्यानुसार थोरात हे नुकसानभरपाईला पात्र असून, कंपनीने अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे कंपनीने त्यांना दोन लाख रुपये आणि खर्च म्हणून पाच हजार रुपये एक महिन्यात द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे. थोरात यांच्याकडून अ‍ॅड. बी. आर. कावरे यांनी बाजू मांडली.