शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत

By मुजीब देवणीकर | Updated: March 9, 2024 19:37 IST

ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी भागातील नागरिकांना शुक्रवारी मनपा प्रशासनाने मोठा दिलासा दिला. दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना पन्नास टक्के बेटरमेंट चार्जेस भरून आपले घर अधिकृत करता येईल. ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही. गुंठेवारीसाठी १०० टक्के शुल्क भरावे लागतील.

शहराच्या आसपास ८० टक्के प्लॉट बाँड पेपरवर विक्री करण्यात आले. अनेक वर्षांपासून नागरिक अनधिकृत घरे बांधून राहत आहेत. मनपा त्यांच्याकडून दुप्पट टॅक्स वसूल करते. अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी शासनाने गुंठेवारी योजनेला मंजुरी दिली. यापूर्वी १० हजार मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला. मनपाला १२५ कोटींचा महसूल मिळाला. गुंठेवारी शुल्कातील सवलतही बंद करण्यात आली होती. पुन्हा सवलत द्यावी, अशी मागणी सुरू होती. प्रारंभी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ६०० चौरस फुटांपर्यंतच सूट देण्याची घोषणा केली. त्यानंतर १५०० चौरस फुटांपर्यंत शुक्रवारी दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून ही सवलत लागू होईल, त्यानंतर जून महिन्यापर्यंत ती लागू राहील, असे जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वास्तुविशारदांचे पॅनलमहापालिकेने यापूर्वी ५२ वास्तुविशारदांचे पॅनल तयार करून गुंठेवारीच्या स्वीकारल्या होत्या. महापालिकेतर्फे वास्तुविशारदांना त्यांच्या फाईलनुसार शुल्क अदा केले होते. आता पुन्हा एकदा पॅनल तयार केले जाणार असून, ज्यांना पॅनलची गरज नाही, त्यांनी सोयीनुसार कोणत्याही वास्तुविशारदामार्फत प्रस्ताव दाखल केला तरी चालेल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका