शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथे महसूल विभागाला माहिती न देता पाणी सोडल्याने अभियंत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:14 IST

महसूळ विभागाला न कळवता केळगाव मध्यम प्रकल्पातुंन पाणी सोडल्याने पाटबंधारे उपविभागाच्या तीन अधिका-यांविरोधात तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात पाणी टंचाई असताना शेतीसाठी पाणी सोडलेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

सिल्लोड (औरंगाबाद) : महसूळ विभागाला न कळवता केळगाव मध्यम प्रकल्पातुंन पाणी सोडल्याने पाटबंधारे उपविभागाच्या तीन अधिका-यांविरोधात तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात पाणी टंचाई असताना शेतीसाठी पाणी सोडलेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

सिल्लोड महसूल प्रशासनाने तालुक्यातील भविष्यकालीन पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना केली आहे. यामुळे महसूल प्रशासनास अंधारात ठेवत पाठबंधारे विभागाने पाणी सोडणे अवैध ठरवत तहसिलदारांनी तीन अधिका-यांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यात औरंगाबाद पाटबंधारे उपविभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी.संत, पाटबंधारे सिल्लोड उपविभागाचे उपविभागीय अभियंता के.वाय.पटेल, शाखा अभियंता पी.सी.राठोड यांच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिजर कलम 107 नूसार फौजदारी कारवाई करित तिघांना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत नोटीस देण्यात आल्या आहे.

30 नोव्हेंबर रोजी सोडले होते पाणी... पाणी वाटप संस्थेने मागणी केल्यामुळे प्रकल्पातून अवैधरित्या पाटाद्वारे पाणी सोडले होते. तहसिलदारानी पाणी टंचाई असल्याने प्रकल्पा मधून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिस देवून पाबंद केले होते. याशिवाय प्रकल्पातिल सर्व विजेच्या डिप्यां बंद केल्या होत्या.एकी कड़े प्रकल्पातुंन  पाणी उपसा बंद करुण त्याच  प्रकल्पातुंन कालव्या खालील शेतकऱ्यां साठी कालव्या द्वारे पाणी सोडल्या मुळे  गावक-यांनी याचा विरोध केला होता.

प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर तहसीलदार संतोष गरड यांनी बंदी केली होती. यासाठी त्यांनी पाणलोट क्षेत्रातील शेतक-यांना नोटीसा देऊन वीज बंद केली होती. तरीही 30 नोव्हेंबरला रात्री प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील ३००  ते ४००  शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिड तास डांबून ठेवले होते. तसेच त्यांनी याची माहिती तहसिलदारांना दूरध्वनीद्वारे दिली. यावर तात्काळ उपाय योजना करत तहसिलदारांनी एक तासात पाणी बंद केले होते.  याप्रकरणावरून पाटबंधारे विभाग व महसूल विभागात चांगलीच जुंपली आहे.

केळगाव प्रकल्पातच पाणीसाठातालुक्यात आगामी काही दिवसात पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह आहेत. भविष्यात केळगाव प्रकल्प सिल्लोड शहरासह तालुक्याची तहान भागवू भागवु शकतो यामुळे यातून शेतीसाठी पाणी सोडू नये अशा सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यांनी याचा विचार न करता अवैधरीत्या पाणी सोडले आहे. - संतोष गोरड, तहसीलदार 

नियमानुसार पाणी सोडले माझ्या अधिकारात वर्तमान पत्रात जाहिरात देऊन वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने शेतीसाठी प्रकल्पातुंन पाणी सोडले होते. बेकायदा पाणी सोडले नाही. - पी. सी. राठोड, शाखा अभियंता 

टॅग्स :water transportजलवाहतूकAurangabadऔरंगाबाद