शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

संपत्तीच्या लालसेने रक्ताचे नातेही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:50 IST

आॅन द स्पॉट.... खुनाच्या घटनेनंतर वरुड सुन्न : दारुड्या घरगड्याने केली अख्ख्या कुटुंबाची वाताहत; मुलाच्या अंत्यसंस्कारालाही आला नाही निर्दयी बाप

श्यामकुमार पुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : संपत्तीची लालसा, त्यात दारुच्या व्यसनाने निर्दयी पित्याला रक्ताच्या नात्याचेही भान राहिले नाही. जमीन नावावर करुन देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा खून झाल्याच्या घटनेने वरुड गाव हादरले आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाºया व मन हेलावून टाकणाºया या घटनेनंतर आमच्या प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता गावकरी याच विषयावर दबक्या आवाजात चर्चा करुन हळहळ व्यक्त करताना दिसले. मृताचे कुटुंब पार हादरुन गेले असून घरगड्यानेच घर दु:खात ढकलल्याची करुण कहाणी ऐकून काळजाचे पाणी होत आहे.बुधवारी कौतिक मिरगे याने मुलगा विजयचा डोक्यात टिकास मारुन खून केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी आरोपी कौतिकला अटक केली. वास्तविक आई-वडील मुलांसाठीच संपत्ती कमवत असतात, पण ही घटना याला अपवाद ठरली आहे. मृत विजयची आई अनिताबाई म्हणाली, मुलाच्या अंत्यसंस्कारालाही निर्दयी बाप आला नाही. तर विजयची पत्नी स्वाती धाय मोकळून रडत होती. मला विधवा व माझ्या मुलांना अनाथ करणाºया सासºयाला कठोर शिक्षा द्या, अशी विनवणीही ती करत होती.शुक्रवारी राख सावडण्याचा कार्यक्रम असल्याने नातेवाईक गावात आले होते. त्यांच्यासमोर हे कुटुंब आक्रोश करुन घटनाक्रम सांगत होते. वडीलांच्या रोजच्या किरकिरीला घरातील सर्व जण व शेजारीही वैतागले होते. दारू पिऊन येऊन मारहाण करणे, धिंगाणा घालणे हे दररोजचे ठरलेले होते. या त्रासाला कंटाळून मी पुण्यात नोकरीला गेलो होतो, असे विजयचा लहान भाऊ विनोद याने सांगितले.एकीकडे मुलगा गेल्याचे दु:ख तर दुसरीकडे पतीला परमेश्वर समजणाºया अनिताबाईला पतीविरुद्ध तक्रार द्यावी लागली. अशा दुहेरी संकटात मयत विजयची आई सापडली आहे. राख सावडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसमोर तिने टाहो फोडला. तिला काय बोलावे, कसा धीर द्यावा, हे आलेल्या लोकांनाही कळत नव्हते.माझ्या पप्पाला आजोबाने मारलेज्या वेळी कौतिकने विजयवर टिकासने हल्ला केला, त्यावेळी विजयचा ७ वर्षांचा मुलगा आदर्श घटनास्थळी हजर होता. माझ्या पप्पाला मारू नका, असे तो व आजी अनिता सांगत होती. पण आजोबाने ऐकले नाही.अशा दाजीची काय पाठराखण करावी?माझ्या बहिणीला व तिच्या कुटुंबाला कौतिक मिरगे (दाजीचा)चा खूप त्रास होता. दारू पिऊन आल्यावर ते कुणाला दोन घास खाऊ देत नव्हते. खून केल्याचा त्यांना थोडाही पश्चात्ताप नाही. अशा दाजीची काय पाठराखण करावी. ते तुरुंगात गेले तर किमान त्यांचे कुटुंब दु:खाने कमवून सुखाने खातील. काही आम्ही मदत करू, असे मयताचा मामा अंकुश सुरासे साश्रूनयनांनी सांगत होता.आता त्या जमिनीचे काय करु?जिवंतपणी माझ्या सासºयाने आम्हाला जमीन दिली नाही, मात्र त्याचे शव चितेवर जाण्यापूर्वी मृत विजयच्या दोन्ही मुलांच्या नावावर ४ एकर जमीन रजिस्ट्री करुन दिली. आधी दिली असती तर माझे पती वाचले असते. मी विधवा व मुले अनाथ झाली नसती. आता त्या जमिनीचे मी काय करु, असे स्वाती म्हणाली.पश्चात्ताप नसणाºया वडिलांना शिक्षा द्यामयत विजयचा पिता कौतिक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला या घटनेचा जराही पश्चाताप नाही. उलट तो आम्हाला अजूनही पाहून घेईन, अशी धमकी देत आहे. यामुळे त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्याला कठोर शिक्षा द्या, असे विनोद सांगत होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी