शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बनावट आधार कार्डाधारे रजिस्ट्री, मुद्रांक कार्यालयाने झटकले हात; पाचजणांवर गुन्हा

By विकास राऊत | Updated: July 26, 2024 16:54 IST

सत्यता पडताळणीची जबाबदारी विभागाची नाही

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील मुद्रांक नोंदणी कार्यालयात चिकलठाण्यातील लाखो रुपये किमतीच्या एका भूखंडाची मार्चमध्ये रजिस्ट्री झाली. त्याच भूखंडाची बनावट आधार कार्डच्या आधारे दुसरी रजिस्ट्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये मे महिन्यातही झाली. हा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने २२ जुलै रोजी वृत्त मालिकेतून उघडकीस आणला. या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीअंती मुद्रांक विभागाने २५ जुलै रोजी पाचजणांविरोधात सिटीचौक पाेलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुय्यम निबंधक बालाजी मादसवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सौरभ सकलेचा (भूखंडाचा बनावट मालक), भूखंड घेणारे शे.एजाज अहमद अब्दुल रशीद, रा. मोंढा नाका, युसूफ खान अयुब खान, रा. रहीमनगर, शे. हुजैफा अहेमद शे.एजाज अहदम, रा. मोंढानाका, राजपूत, रा. जवाहर कॉलनी या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. बोगस आधार कार्ड, भूखंडाचा बोगस मालक उभा करून मुद्रांक विभागात रजिस्ट्री होत असेल तर सामान्य नागरिकांना आता मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना बारकाईने काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणात मुद्रांक विभागाने तक्रारी, कागदपत्रांची सत्यता पडताळणीचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. सगळ्यांना फसविणाऱ्या बनावट मालकाचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गायके हे तपास करणार आहेत.

भूखंडाचे खरे मालक असलेल्या सौरभ सकलेचा यांनी जिल्हाधिकारी, पोलिसांकडे धाव घेतली. बनावट आधार कार्ड, बनावट फोटो, स्वाक्षरी बनावट, सगळी कागदपत्रे बोगस दाखवून एकाच मालमत्तेची सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ येथे नोंदणी केल्याची तक्रार त्यांनी केली होती. खोटे आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून खरेदी-विक्रीची नोंदणी मुद्रांक विभागाने प्रमाणित केलीच कशी, कमी मुद्रांक शुल्क घेऊन मालमत्ता विक्रीचा व्यवहार पूर्ण कसा काय केला? हे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.

नेमके प्रकरण काय होते?चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची विक्री मार्चमध्ये जालन्यातील मूळ मालकाने करून दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये रजिस्ट्री करून दिली. रजिस्ट्रीनंतर सातबाऱ्यावर नाव घेण्यासाठी चिकलठाणा तलाठी सजा येथे अर्ज केला. परंतु, मूळ मालकाच्या नावे दुसरी रजिस्ट्री क्रमांक ३५००/२०२४ ही ३१ मे रोजी झाली असून, सातबाऱ्यावर पहिल्या व्यवहारातील नाव घेऊ नये, असा अर्ज आल्याचे समोर आले. मूळ मालकाने स्वत: विकलेल्या मालमत्तेची अडीच महिन्यांनंतर ३० लाख रुपयांत विक्रीची रजिस्ट्री केली. बनावट रजिस्ट्री झाली असून याप्रकरणी सुनावणी ठेवली असता खरे मालक सौरभ सकलेचा यांनी सर्व कागदपत्र सादर केली. त्यांचे नाव वापरून, बनावट ओळखपत्र तयार करून अन्य कुणीतरी भूखंड विक्रीची रजिस्ट्री करून दिली, असे मादसवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कागदपत्रांची सत्यता पडताळणीचे अधिकार नाहीनोंदणी अधिनियम १९०८, महाराष्ट्र नोंदणी नियमानुसार व न्यायालयाच्या आजवरच्या निर्णयानुसार दुय्यम निबंधकांना दस्तावेजातील मिळकतीचे मालक व मालकी हक्काची चौकशी व त्यासोबत जोडलेल्या पुराव्यांची वैधता तपासण्याचे अधिकार नाहीत. मात्र, नोंदणी करताना खोटे कागदपत्र, बनावट व्यक्ती आढळून आल्यास फौजदारीचे अधिकार आहेत, असे पाेलिसांत तक्रारीत स्पष्ट केले आहे. चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची रजिस्ट्री होताना मूळ मालक बोगस आहे की नाही, साक्षीदार कोण आहेत, आधार कार्ड लिंक झाले नसताना रजिस्ट्री कशी केली हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी