शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनधिकृत बांधकामांच्या रजिस्ट्रीला चाप; NAसह नकाशा, गुंठेवारी नियमितीकरणानंतरच खरेदी-विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:48 IST

बोगस एन-ए प्रकरणी नगररचना संचालकांपर्यंत तक्रारी गेल्या. परंतु, त्यात काहीही निर्णय न झाल्यामुळे यात सक्रिय असलेल्या रॅकेटचे फावते आहे.

छत्रपती संभाजीनगर : एनए बोगस असणे, गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रमाणपत्र नसणे, नगररचना विभागाच्या नकाशांची पूर्तता नसणे. महापालिका, महानगर विकास नियोजन प्राधिकरणाकडील मंजुरी नसतानाही मुद्रांक विभागात अनधिकृत प्लॉट व बांधकाम झालेल्या मालमत्तांची खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने रजिस्ट्री होत आहे. शहरातील महाभागांकडून असे प्रकार होत असल्यामुळे मुद्रांक विभागाने दुय्यम उपनिबंधकांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. मनपा, प्राधिकरण, नगररचना विभागाचे अधिकृत दस्त नसतील, तर नोंदणी करू नये, असे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी दिले आहेत.

मुद्रांक अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरातील काही बिल्डर महापालिका, महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून बांधकामाचा नकाशा मंजूर न करता नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदीनुसार खरेदी-विक्री हस्तांतरणाचे पेपर्स सादर करतात. त्यानुसार मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्री व इतर दस्ताची नाेंदणी केली जाते. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम न झाल्यामुळे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

यापुढे महापालिका, छावणी, प्राधिकरणांच्या कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रात नगरनियोजन करण्यास व बांधकाम परवानगी देण्यास सक्षम असणाऱ्या अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे केलेल्या बांधकामाव्यतिरिक्त इतर बांधकामाचे हस्तांतरण दस्त सक्षम अधिकाऱ्याने शासनाच्या अधिसूचनेनुसार गुंठेवारी अधिनियमांच्या तरतुदीनुसार बांधकाम नियमित हवे. त्याचे प्रमाणपत्र व मंजूर नकाशा संबंधिताने दस्तासोबत जोडून दिले तर मुद्रांक विभागाने नोंदणीची कार्यवाही करावी.

सगळे पेपर तपासा, चार महिन्यांची मुदत द्यानगररचना, मनपा, कटकमंडळे, प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा किंवा गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला व मंजूर नकाशा दस्तासोबत जोडला नसेल तर दस्त कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी परत करावेत. तेथून पुढे चार महिन्यांत संबधित अधिकाऱ्याची परवानगी घेऊन दस्त नोंदणीसाठी दाखल करता येता येतील, असे आदेश मुद्रांक अधिकाऱ्यांनी दुय्यम उपनिबंधकांना दिले आहेत.

प्राधिकरणात काय सुरू आहे?महानगर विकास प्राधिकरणात ३१३ गावांचा समावेश आहे. झालर क्षेत्रातील २४ गावांत सिडको प्राधिकरण आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. या बांधकामांच्या रजिस्ट्रीदेखील झाल्याचा मुद्दा तत्कालीन विभागीय आयुक्तांनी निदर्शनास आणून दिला होता.

महापालिका हद्दीत काय स्थिती?गुंठेवारी वसाहतींमधील बांधकामे गुंठेवारी नियमितीकरण न करता विक्री होत आहेत. त्यामुळे बांधकाम परवानगी न घेता जुनी घरे पाडून नवीन बांधकामे होत आहेत. गुंठेवारीला पळवाट काढून सातबाऱ्याच्या आधारे रजिस्ट्री होत असल्याच्या तक्रारी अप्पर तहसीलमध्ये मध्यंतरी आले होते. गुंठेवारीतील मालमत्तांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मुद्रांक पेपरवरच होत आहेत. जुन्या मालकाने घर विकल्यास ते नियमित होत नाही, तोवर नवीन मालकाचे नाव मनपा दप्तरी लागत नाही. यासाठी खर्चाचा भुर्दंड नवीन मालकाला बसेल.

बोगस एन-एचा सुळसुळाटबोगस एन-ए च्या आधारे रजिस्ट्री केली जात आहे. त्या आधारे बांधकाम परवानगी मिळते. बोगस एन-ए प्रकरणी नगररचना संचालकांपर्यंत तक्रारी गेल्या. परंतु, त्यात काहीही निर्णय न झाल्यामुळे यात सक्रिय असलेल्या रॅकेटचे फावते आहे. परिणामी, अनधिकृत बांधकामे थांबविण्यात प्रशासनाच्या सर्व यंत्रणा हतबल आहेत.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी