शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या ७८८ रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:41 IST

चौकशी अहवालात ठपका; वर्षभरात ३० हजार खरेदी-विक्रीचे व्यवहार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक नोंदणी विभागाने गेल्या वर्षभरातील केलेल्या रजिस्ट्रींची चौकशी करून सादर केलेल्या अहवालात शहरातील तीन कार्यालयांत एकूण ७८८ रजिस्ट्रींमध्ये तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

जिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे यांनी सुधारित अहवाल चौकशी समितीकडे दिला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या पुराव्यासह तक्रारी आल्यानंतर त्यांनी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. समितीने सप्टेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या वर्षभरातील दस्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नोंदणी विभागाने दीड महिन्यानंतर चौकशीचा अहवाल सादर केला. वर्षभरात ३० हजार दस्तांची नोंदणी झाली असून, त्यात केवळ ५०० रजिस्ट्री झाल्याचे सांगण्यात आले होते. तो अहवाल फेटाळून सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश समितीने दिले. त्यानुसार नोंदणी विभागाने सोमवारी सुधारित अहवाल सादर केला. त्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये ३४४, दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ५ मध्ये २५५ तर दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ मध्ये १९९ रजिस्ट्रींची नोंदणी तुकडाबंदीचे उल्लंघन करून झाल्याचे म्हटले आहे.

एनएच्या चौकशीचाही विचारनोंदणी विभागात काही ठिकाणी बनावट एनएद्वारे अनेक रजिस्ट्रींची नोंदणी झाल्याची चर्चा आहे. यावर माजी विभागीय आयुक्तांनी देखील नगररचना संचालकांना पत्रव्यवहार केला होता. केवळ एनए जोडल्याने काही ठिकाणच्या व्यवहारांना चौकशीतून वगळले आहे. त्यामुळे बेकायदेशीर रजिस्ट्री नोंदणीचा आकडा कमी असल्याचे बोलले जात आहे. ज्या रजिस्ट्री ६०० चौ. मीटरपेक्षा कमी आहे, अशा सर्वच दस्तांसोबत जोडलेल्या एनएचीही तपासणीचा विचार प्रशासन करीत आहे. कुठल्याही प्राधिकरणाचे मंजूर रेखांकन (लेआऊट) नसलेल्या रजिस्ट्री बेकायदेशीर असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग