छत्रपती संभाजीनगर: स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात गेल्या वर्षभरात २७,५९५ जणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आणि ८४१५ किती जणांना रोजगार मिळाला. बहुतांश कारखान्यांनी कुशल कामगार घेण्यासाठी शिबिरे घेतली, त्यातून बेरोजगारांना वर्षभरात संधी देण्यात आली.
वर्षभरात २७,५९५ तरुणांनी केली नोंदणीनोकर भरतीच्या प्रक्रियेला उशीर झाल्याने कारखान्यात भरण्यासाठी कॉलेज व आयटीआयच्या मुलांनी रोजगारांसाठी आपली नोंदणी करावी यासाठी प्रयत्न केलेले आहे.त्यामुळे वर्षभरात २७,५९५ जणांनी आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे.
कोणत्या महिन्यांत किती नोंदणी?जून, जुलै महिन्यात अधिक नोंदणी करण्यात आलेली आहे. निकाल लागल्यानंतर युवक-युवतीने या ठिकाणी नोंदणी करत नोकरीच्या शोधार्थ प्रयत्न केले तर विविध कारखान्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले आणि त्यातून या तरुणांना संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
वर्षभरात २५ रोजगार मेळावेगतवर्षी शहर व तंत्रज्ञानाच्या जोरावर जवळपास २५ पेक्षा अधिक रोजगार मेळावे घेेण्यात आलेले असून, त्यातून बहुतांश विद्यार्थ्यांना चांगल्या आस्थापनामध्ये कौशल्याच्या जोरावर नोकरीची संधी देण्यात आलेली आहे.
८४१५ जणांना रोजगाररोजगार मेेळाव्यातून बहुतांश युवकांना चांगल्या पगाराच्या नोकरी मिळाल्या आहेत. कौशल्य असलेल्या तरुणांना जास्त काळ नोकरीचा शोध घ्यावा लागत नाही. संधीच सोनं करण्यावर या युवकांचा भर असतो.
रोजगार मेळाव्याची वाट पाहतो..कौशल्य शिक्षण असल्यामुळे नोंदणी केलेली आहे, रोजगार मेळाव्यात जॉब मिळण्याचा प्रयत्न आहे.- आनंद काकडे
तंत्रशिक्षणाचा फायदा होईलकौशल्य शिक्षण घेत असल्याने मोठ्या रोजगाराची संधी आल्यास ती सोडणे शक्य नाही. अर्ज केलेला असून, कॉल आला की जाऊ.- विनोद साळवे
युवकांना रोजगारांच्या संधी ...विविध मल्टिनॅशनल कारखाने रोजगार मेळाव्यातून कौशल्यपूर्ण तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी छोटे-छोटे वाटणारे परंतु महत्त्वाचे कोर्स अगदी मोफत चालवून रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध केलेली आहे.- सुरेश वराडे, सहायक आयुक्त