शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत आयुर्वेदिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:48 IST

केंद्रीय आयुष मंत्रालयाने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवले आहे. यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान नव्याने नोंदणी करता येणार आहे.

ठळक मुद्देगोंधळ सुरूच : संस्थाचालकांची चांदी होणार; नोंदणीसाठीचे पर्सेंटाईल केले कमी

औरंगाबाद : केंद्रीय आयुष मंत्रालयाने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवले आहे. यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान नव्याने नोंदणी करता येणार आहे.आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा यावर्षी फज्जा उडाला आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठीचे पर्सेंटाईल खुल्या गटासाठी ५० टक्के आणि आरक्षित गटासाठी ४० टक्के ठेवण्यात आले होते. यास राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. पर्सेंटाईल जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून मुकणार असल्याचा युक्तिवादही करण्यात आला होता. काही राज्यांत हे पर्सेंटाईल न्यायालयाने घटवले. यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाने निर्णय घेत हे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नीटला खुल्या गटात ८६ आणि आरक्षित गटात ६७ गुण घेतलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करण्यास राज्य सीईटी सेलने ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान मुदत दिली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. यानंतर ६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान यात नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. यानंतर ११ रोजी रिक्त राहिलेल्या जागांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर पुन्हा एका प्रवेश फेरी राबविण्यात येईल. ही फेरी १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. ही सगळी प्रवेश प्रक्रिया ऐन दिवाळीत होणार असल्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.कोटप्रवेशासाठीचे पर्सेंटाईल खुल्या गटासाठी ५० वरून ३५ वर आणले. आरक्षित गटासाठी हीच टक्केवारी ४० वरून २५ केली. हे सगळे अनाकलनीय आहे. यात व्यवस्थापन कोट्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. याचवेळी नव्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेशही मिळणार आहेत.-सावन चुडीवाल, अभ्यासक, प्रवेश प्रक्रिया

टॅग्स :Educationशिक्षणHealthआरोग्य