शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

बनावट पदवीवर पीएचडीला प्रवेश घेणाऱ्यावर गुन्हा नोंदवा; रिपाईचे ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन

By राम शिनगारे | Updated: July 24, 2025 17:46 IST

बनावट पदवीच्या आधारे प्रवेश घेणाऱ्यास विद्यापीठ पाठिशी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बनावट कागदपत्राच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेणाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी रिपाई (आठवले) पक्षातर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन गुरूवारी (दि.२४) सकाळी करण्यात आले.

रिपाई (आठवले) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नगराज गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद हबीबुद्दीन या विद्यार्थ्याने वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या बी.एससी. व एम.एससी.ची बनावट गुणपत्रके आणि पदव्या तयार करून विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात ‘पेट’च्या माध्यमातुन पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. याविषयी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाने वाराणसीच्या विद्यापीठाकडे पदव्यांची पडताळणी केली असता ३० जून २०२५ राेजी पदव्या बनावट असल्याचे कळविले. त्यानुसार विद्यापीठ ८ जुलै २०२५ रोजी त्याची पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली. मात्र, अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेणारे कोहिनुर संस्थेचे आस्मा खान आणि मकसूद खान यांच्या विरोधात २६ मार्च रोजी विद्यापीठाने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली. 

अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यामात्र, सिद्दीकी प्रकरणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे हे त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गायकवाड यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देण्यासाठी ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ गेटपासून आंदोलनाला सुरूवात केल्यानंतर काही अंतरावर पोलिसांनी अडवत आंदोलनकर्त्यांना बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करून आंदोलकांना सोडून देण्यात आले. यावेळी प्रशांत वाहुळे, विकास राऊत, अश्वीन मेश्राम, मंगेश भवरे, नितीन कांबळे, सिद्धार्थ खोतकर, अनिल आगळे, आनंद शिंदे, किरण मगरे, नितीन साळवे, चेतन जाधव इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाराणसी विद्यापीठास कळवलेविद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्याची पीएच.डी.नोंदणी रद्द केली. तसेच वारणसीच्या विद्यापीठाला संबंधितवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविले. आता त्या विद्यापीठाने संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी. यासंदर्भात पोलिस आयुक्तांनाही पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी कळविले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद