शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सिल्लोडमध्ये सत्तार ‘सेना’ चे नवनिर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:26 IST

१९८४ पासून असलेला कॉंग्रेसचा हात सोडला 

ठळक मुद्दे१९८४ साली सिल्लोड ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात लोकसभा उमेदवारी देण्यावरून आ.सत्तार यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत बिनसले. मे, जून, जुलै असे तीन महिने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत राहिल्या.

औरंगाबाद : कॉंग्रेससोबत ३५ वर्षांपासून असलेले सर्वधर्म-समभावाची नाळ तोडून अखेर आ.अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत सोमवारी प्रवेश करून नवीन राजकारणाचा ‘श्रीगणेशा’ केला. शिवसेनेला आ.सत्तार यांच्या रुपाने चेहरा मिळाला असून, भाजपसोबत युती तुटल्यास सत्तार हेच सेनेचे उमेदवार असतील. आता सत्तार ‘सेना’ चे नवनिर्माण सिल्लोडमध्ये होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. 

१९८४ साली सिल्लोड ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९९४ साली नगराध्यक्ष सिल्लोड, २००१ साली ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. २००७ साली त्यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर २००९ साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. २००९-१० साली त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

२०१४ साली काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी देण्यावरून आ.सत्तार यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत बिनसले. त्यामुळे त्यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मे, जून, जुलै असे तीन महिने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत राहिल्या. परंतु सिल्लोड भाजपचा त्यांना कडाडून विरोध झाला. त्यांच्या विरोधात सिल्लोड भाजप एकवटल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय सोमवारी घेतला. 

अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी मिळणार?आ.सत्तार यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाडा संपर्कप्रमुख अथवा प्रदेशप्रमुख अशा स्वरुपाचे एखादे पद सत्तार यांना येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणे शक्य आहे. 

आ.सत्तार यांचा राजीनामा मंजूरआ.सत्तार यांचा राजीनामा तातडीने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून मंजूर करून घेण्यात आला. गणोरी येथील एका कार्यक्रमात बागडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.अंबादास दानवे यांनी गाठले. सोबत समीर सत्तारदेखील होते. आ.दानवे म्हणाले, आ.सत्तार यांचा राजीनामा बागडे यांच्याकडून मंजूर करून घेण्यात आला. 

राजकारणात सर्व काही चालतेआ.सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशावर शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, राजकारणात सर्व काही चालते. शत्रू कधी मित्र  होतात. तर मित्र कधी शत्रू होतात. पक्षाचा निर्णय आहे. ते आता शिवसेनेत आले आहेत. सगळ्यांना सांभाळून घेऊ.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद