हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ५८ वाहनचालकांविरूद्ध पोलिसांनी शनिवारी विविध पोलिस ठाणे हद्दीत कारवाई केली. त्यात ८ हजार ६00 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला.पोलिस प्रशासनाच्या वतीने दररोज अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येते. अवैध वाहतुकीला आळा बसावा व वाहतूक नियमांचे वाहनधारकांनी पालन करावे यासाठी सदर मोहीम राबविण्यात येते. शनिवारी पोलिसांनी पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली रबविण्यात आलेल्या मोहीमेत एकूण ५८ वाहनचालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार ६00 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. /(प्रतिनिधी)
जिल्हाभरात ५८ चालकांकडून दंडाची वसुली
By admin | Updated: August 31, 2015 13:46 IST