शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यासाठी शासनाकडे शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:20 IST

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मिळाली मंजुरी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात पोहोचणार आहे.

खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय मागील अनेक महिन्यांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्राध्यापकांच्या वेतनाचे पैसे परत करणे असो की, उच्च न्यायालयाचे अवमान प्रकरण. संस्थाचालकाचे बनावट पदव्यांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेण्याचे प्रकरण समोर आले हाेते. त्यात विद्यापीठ प्रशासनाने उच्च न्यायालय अवमान याचिका प्रकरण प्राचार्यांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करत डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीला महाविद्यालय प्रशासनाने अनेक बाबीत मागितलेली कागदपत्रे शेवटपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्या आधारावर समितीने महाविद्यालयातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले. या अहवालावर प्रभारी प्राचार्यांचा खुलासाही मागितला होता. त्यांनी खुलासा दिला नाही. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व सचिव न्यायालयीन कामात व्यस्त असल्यामुळे खुलासा करण्यास प्रभारी प्राचार्यांनी विद्यापीठाकडे वेळ मागितली होती. प्रशासनाने हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवला. बैठकीत चर्चा होऊन महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यासाठी प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चशिक्षण विभागाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला गेला.

बंब यांनीही मागितली माहितीगंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनीही उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालयातील सीएचबीसाठी किती निधी वाटप केला? शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर किती खर्च झाला? कोहिनूर संस्थेचे अंकेक्षण केव्हापासून झाले? त्यात महाविद्यालयाकडे असलेली थकबाकी किती? इ. १० प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यानुसार उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने आ. बंब यांना नियमानुसार माहिती दिली आहे. त्यातही अनेक बाबींचा उलगडा झाला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र