शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

जप्त केलेल्या वाळूचे परस्पर हस्तांतरण

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

कळंब : महसूल विभागाने पंचनामा केलेला असतानाही या वाळूसाठ्याचे परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब : शेतामध्ये अवैधरीत्या वाळूसाठा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा केलेला असतानाही या वाळूसाठ्याचे परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील खोंदला येथील आबासाहेब मुळीक यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्वे क्र. ४ मधील शेतजमिनीत जवळपास २८ ब्रास वाळूचा साठा अवैधरीत्या करण्यात आला होता. या साठ्याचा ईटकूर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी पांडुरंग श्रीपती आवटे यांनी स्थळपंचनामा करून आपला अहवाल तालुका प्रशासनास सादर केला होता. याप्रकरणी तहसीलदारांनी दंड ठोठावून वाळू साठा जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु, याबाबत मुळीक यांनी सदर वाळू विहिरीच्या बांधकामासाठी हस्तगत केली असल्याने दंड माफ करावा, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण पुनर्विलोकनासाठी तहसीलदारांकडे परत पाठविले होते. याबाबत तहसीलदारांनी सुनावणी घेऊन अवैधरित्या वाळू साठा करणे व पंचनामा झाला असतानाही तो परस्पर हस्तगत करणे आदी कारणावरून आबासाहेब मुळीक यांच्यावर २ लाख ३० हजारांचा दंड आकारून पुढील कार्यवाहीसाठी ईटकूर येथील मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले. यावरून कळंब पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी पंढरीनाथ श्रीपती आवटे यांच्या फियादीवरून आबासाहेब मुळीक याच्याविरूध्द कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)