शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंटरसेप्टर’च्या नजरेने केव्हा, कुठे आणि कोणता वाहतूक नियम तोडला याच्यासह पावती येणार घरपोच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 18:32 IST

सावधान, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर ‘इंटरसेप्टर’ नजर

ठळक मुद्देप्रतिष्ठितांसह राजकीय नेत्यांनाही पावती स्थळ, वेळ, नियम मोडल्याचे कारण फोटोसह प्रिंट घरपोहोच

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चूक अत्याधुनिक यंत्रात कैद करून त्याच्या दंडाच्या पावत्या प्रतिष्ठितांसह राजकीय व्यक्तींनाही आॅनलाईन घरपोहोच मिळाल्याने सुसाट पळणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या इंटरसेप्टर यंत्राचा वापर बायपास, तसेच शहराबाहेरील रस्त्यावर केला जात आहे. 

रस्ते अपघातातील कारणे लक्षात घेता वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्यांना रस्त्यात अडवूनही त्यांची मानसिकताच राहत नाही. त्यावेळी पोलीस कर्मचारी आणि वाहनचालकात वादाचे प्रसंग उद्भतात. त्यामुळे ‘हातच्या काकणाला आरसा कशाला’ या उक्तीप्रमाणे काळाची पावले ओळखून पोलीस यंत्रणाही अत्याधुनिकतेची कास धरताना दिसत आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या महामार्गावरील वाहनांच्या वेगमर्यादेवर आळा घालण्यासाठी काही ठराविक वेगमर्यादा ठेवलेल्या आहेत; परंतु त्याचे पालन कोणीच करताना दिसत नसल्याचे आढळून आल्याने यावर आळा घालण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ ही २ यंत्रे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात आली आहेत. महाराष्ट्रभर अशा ९६ वाहनांचा समावेश यंदा शासनाने केला आहे. धोका ओळखून नियमांचे पालन केल्यास स्वत:चा, तसेच निष्पाप नागरिकांचा जीव वाचविण्यास आपला सहभाग असावा, हा यामागचा उद्देश आहे. 

काळ्या काचा आणि मर्यादेपेक्षा गतीने वाहन चालविणाऱ्यांना इंटरसेप्टर यंत्र किमान तीन किलो-मीटरपासून देखील कॅप्चर करते आणि त्यातून पावती तयार करून त्याचा संदेश वाहनधारकांना जातो आणि त्याच्या घरीसुद्धा घरपोहोच पावत्या पाठविल्या जात आहेत. त्यात शहरातील अनेक राजकीय मंडळीदेखील सुटलेली नाहीत. नावे मात्र सूत्रांकडून सांगण्यात आलेली नाही. 

यंत्रात दुजाभाव नाहीवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर यंत्रातून स्थळ, वेळ, गुन्ह्याचा प्रकार, नंबर प्लेटच्या फोटोसह दंडात्मक पावती तयार होऊन वाहनधारकाच्या नावे मोबाईल नंबरवर संदेश जाऊन धडकतो. एवढेच नव्हे तर त्या यंत्राला दिलेल्या कमांडनुसार त्यात कोणीही सुटणे शक्य नाही. पोलीस कर्मचारीदेखील सुटणे शक्य नाही. शहर आणि महामार्ग अशा प्रत्येक रस्त्यावर वेगमर्यादेच्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. अन्यथा तुमच्या नावे पावत्या जमा होऊन हायवेला तुम्ही ज्याही ठिकाणी सापडलात त्या ठिकाणी संपूर्ण आॅनलाईन दंड तुम्हाला अदा करावा लागेल.      - शेषराव उदार (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा) 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद