शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीमागील वाईट हेतू कळला, तरुणीने दुरावा ठेवला; संतापलेल्या तरुणाने रस्त्यात गाठले अन्...

By बापू सोळुंके | Updated: April 8, 2023 18:25 IST

साथ सोडताच तरूणीस केली मारहाण; पोलिसांनी नोंदविला गुन्हा

छत्रपती संभाजीनगर: खाजगी कंपनीत एकत्र काम करीत असताना तरूणीसोबत मैत्री केली. मैत्रीमागे त्याचा वाईट हेतूने असल्याचे तिच्या लक्षात येताच त्याने त्याची मैत्री तोडली. याचा राग आल्याने तरूणाने तिला गाठून विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना न्यु हनुमाननगर येथे ६ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात विनयभंग, मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

कृष्णा विष्णू अहिरे (२५,रा. मिलिंद कॉलनी, खडकेश्वर)असे आरोपीचे नाव आहे. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी एका खाजगी कंपनीत एकत्र काम करीत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. तेव्हा त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. दरम्यान तिने तो जॉब सोडला आणि त्याच्यासोबत बोलणेही बंद केले. ही बाब आरोपी कृष्णाला खटकली. तिला फोन करून जवळीक निर्माण करण्यासाठी तो तिचा पाठलाग करायचा. हेतू चांगला नसल्याचे पीडितेच्या लक्षात येताच त्याला स्पष्ट शब्दात सुनावले. मात्र यानंतरही तो तिचा पाठलाग करीत होता. 

६ एप्रिल रोजी रात्री ती न्यू हनुमाननगर येथे असताना आरोपीने तिला गाठले आणि तिचा विनयभंग केला. पिडितेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. दोघांचे छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. याप्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने शेवटी कृष्णाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस उपनिरीक्षक शेख या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद