शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा किट, संसारोपयोगी भांड्यांपासून खरे कामगार वंचित; वितरण सेंटरची आवश्यकता

By साहेबराव हिवराळे | Updated: July 18, 2024 20:39 IST

मजुरांनी स्वत: ऑनलाईन अर्ज भरूनही सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मजूर, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य तसेच संसारोपयोगी भांडी देऊन त्यांना मदत व्हावी यासाठी ‘कामगार किट’ वाटपाची योजना सरकारने आणली. परंतु, या सुरक्षा किट आणि संसारोपयोगी भांड्यांच्या किटपासून खरे नोंदणीकृत कामगार वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि नंतर निकालाचा सोपस्कार झाला असला तरी हे किट वाटप त्या संपूर्ण प्रक्रियेत राहिले. आता आचारसंहिता संपली असूनही किट वाटप काही केल्या होत नाही. परंतु, ठराविक नेत्यांच्या विविध शिबिरात ही भांडी पोहोचवली जात असून, तेथे याचे वाटप केले जात आहे.

किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शासनाद्वारे सांगण्यात आले. यासाठी सर्वसामान्य मजुरांनी स्वत: ऑनलाईन अर्ज भरूनही सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. ९० हजार लोकांना भांड्यांचे किट वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिले नोंदणी करा आणि त्यानंतर तुमचे नाव येईल व किट वाटप करण्यात येईल. तोपर्यंत आम्हाला संपर्क साधू नका, असे कामगार कल्याण खात्याद्वारे सांगण्यात येत आहे.

अधिकारी म्हणतात, दलालाचा हस्तक्षेप नको. मजुरांनी स्वत:च ऑनलाईन अर्ज भरून त्यांच्या हक्काचे साहित्य घेऊन जावे. असे सांगत असले तरी अनेकांना फक्त चकरा मारल्याशिवाय हाती काहीच मिळत नाही. मग, मजूर वाऱ्यावर आणि विविध शिबिरांचे ट्रक गोदामावरून भरून जात आहेत.- गौतम हिवराळे, मजूर

पैठण रोड गोडाऊनवर थांबलेल्या नागरिकांना नाना प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. येथे आमचा नंबर कधी येणार हा प्रश्न आहे. किट नसल्याचे कारण सांगून प्रत्येकासाठी सूचना फलक लावण्यात येतो. परंतु अनेकांच्या डोळ्यांदेखत टेम्पो, ट्रक भरून किट कुठे जात आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.- कृष्णा दणके (मजूर)

१ लाख ३५ हजार कामगारांची नोंदणी झालेली आहे. जवळपास ९० हजार भांड्यांचे किट वाटप करावयाच्या आहेत. त्या बहुतांश शिबिरात वाटप होत आहेत. सर्वसामान्यांना वाटपासाठी मनुष्यबळ आणि तालुकानिहाय वाटप केंद्राची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.- शांतीलाल वर्मा (गोडाऊन इन्चार्ज, कामगार कल्याण विभाग) 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद