शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खरेखुरे रँचो डॉक्टर्स; ‘व्हॅक्युम’ने तब्बल ३२५ डिलिव्हरी!, औरंगाबादला ‘थ्री इडियट्स’चा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:34 IST

325 Delivery by Vacuum : वर्षभरात  एक-दोन नव्हे, तर ‘व्हॅक्युम’ने तब्बल ३२५ प्रसूती झाल्या आहेत. या प्रसूती करणारे रँचो आहेत घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स. 

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘थ्री इडियट्स’ चित्रपट सर्वांना आठवत असेल. त्यातील ‘रँचो’ म्हणजे अभिनेता आमिर खानची भूमिकाही लक्षात असेल. चित्रपटात या रँचोने व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने अभिनेत्रीच्या बहिणीची प्रसूती केली होती. अशा  गुंतागुंतीच्या प्रसूती केवळ चित्रपटांपुरत्याच मर्यादित नाहीत, तर प्रत्यक्षातही होतात. वाचून दचकलात? पण औरंगाबादेत हे प्रत्यक्ष घडते आहे. वर्षभरात  एक-दोन नव्हे, तर ‘व्हॅक्युम’ने तब्बल ३२५ प्रसूती झाल्या आहेत. या प्रसूती करणारे रँचो आहेत घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स. मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड घाटी रुग्णालयात वर्ष २०२० मध्ये अशा गुंतागुंतीच्या ३२५ प्रसूती झाल्या आहेत. गुंतागुंतीच्या प्रसूती सिझेरियनशिवाय व्हॅक्युमच्या मदतीने येथील डॉक्टरांनी यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे घाटीतील डॉक्टर एक प्रकारे  खरेखुरे रँचो  आहेत. घाटीत वर्षाला १४ हजार ते १८ हजार प्रसूती होतात. म्हणजे महिन्याला १८ ते ४४  अशा प्रकारच्या प्रसूती डॉक्टर करतात. या प्रकारच्या प्रसूतीला वैद्यकीय क्षेत्रात ‘इस्ट्रुमेंटल डिलिव्हरी’ असे म्हटले जाते.

का केली जाते व्हॅक्युम प्रसूती?प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. बाळाचे डोके खाली सरकते. परंतु नंतर डोके बाहेर यायचे थांबते. अशा वेळी सिझेरियन करणे अशक्य होते आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी वाटही पाहता येत नाही. तेव्हा व्हॅक्युम, चिमटा वापरून प्रसूती केली जाते; पण गर्भपिशवीचे तोंड उघडले नाही तर अशी प्रसूती करता येत नाही.

केवळ २ टक्के बाळे ‘एनआयसीयू’त - अशा प्रकारची प्रसूती झाल्यानंतर केवळ २ टक्के बाळांना उपचारांसाठी ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागले, असे डॉक्टरांनी सांगितले. व्हॅक्युम डिलिव्हरीमुळे सिझेरियन प्रसूती करण्याचे टळते.

- व्हॅक्युम प्रसूती ही केवळ तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात. त्यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. त्यामुळे माता आणि नवजात बाळ सुरक्षित राहतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.

व्हॅक्युम प्रसूती ही घाटीत अनेक वर्षांपासून होते. गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. तेव्हा बाळ बाहेर यायचे थांबते. वर्षभरात ३२५ प्रसूती झाल्या. अतिशय सतर्कपणे ही प्रसूती करावी लागते. थोडीही चूक आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केवळ तज्ज्ञ डॉक्टरच ही प्रसूती करतात.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी 

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद