शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

...अन पुन्हा उजळला दख्खन का ताज 'बीबी का मकबरा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 19:53 IST

पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मुख्य घुमटासह प्रवेशद्वाराचे वैज्ञानिक संवर्धन, चित्र, नक्षिकामाचे संवर्धन अंतिम टप्प्यात

- योगेश पायघनऔरंगाबाद ः दख्खन का ताज म्हणून जगद्विख्यात असलेल्या बीबी का मकबऱ्याचा काळवंडलेला मुख्य घुमट वैज्ञानिक संवर्धनाने उजळला आहे. तर मुख्य प्रवेशद्वार, भिंतीवरील चित्र संवर्धन पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सात महिन्यांपासून सुरू असलेले संवर्धनाचे काम पूर्ण होत आल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून सांगण्यात आले.

‘लोकमत’ने याबाबत वृत्त देऊन संवर्धनाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून जून २०२१ मध्ये माॅडेलर मनोज सोनवणे यांच्यासह तज्ज्ञ, कारागीर यांनी मकबऱ्याचा मुख्य घुमट, संगमरवरी जाळ्या, प्रवेशद्वाराच्या वैज्ञानिक संवर्धनाचे काम हाती घेत पूर्ण केले. त्याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंती, आतील नक्षीकाम असलेला भव्य घुमटाची साफसफाई करून वातावरणाने खराब झालेले नक्षिकामाचे वैज्ञानिक संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याशिवाय परिसरात पक्ष्यांना रोखण्यासाठी जाळ्या लावण्यासह दगडी फ्लोरिंग दुरुस्तीचे कामही सध्या सुरू आहे.

घृष्णेश्वर मंदिरातील काजळी काढलीवेरूळ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील गाभारा, अंतराळ, अर्धमंडपाची स्वच्छता करून काळजी काढल्याने मंदिर आतून उजळून निघाले आहे. पितळखोरा लेणी, मकबऱ्याच्या परिसरातील मशीद, वास्तू संग्रहालय, ग्रंथालयाच्या इमारतींचेही संवर्धन करण्याची मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.

माॅडेलर, फोटोग्राफर गेल्यावर संवर्धन कसे होणार ?पश्चिम क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील रासायनिक संवर्धनाचे काम औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयातून सुरू होते. तुटपुंज्या मनुष्यबळावर हे काम सुरू होते. आता नव्याने कार्यालयाची संरचना झाल्याने पश्चिम क्षेत्राचे औरंगाबाद, नागपूर मंडळ आणि मुंबई असे दोन भाग झाले. येथील माॅडेलर, फोटोग्राफर या संवर्धनातील महत्त्वाच्या कलाकारांची पदे इतर विभाग हलविण्यात आली. त्यामुळे येथील शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धनाचे भविष्यातील कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे

काळवंडलेल्या मार्बलच्या सफाईसाठी ट्रीटमेंटप्रवेशद्वारावरील चित्रांचे संवर्धन आणि घुमटाचे, काळवंडलेल्या मार्बलच्या सफाईसाठी आवश्यक ट्रीटमेंट करण्यात आले. प्रवेशद्वाराच्या संवर्धनाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या स्वच्छतेचे, वैज्ञानिक संवर्धनाचे काम पूर्ण झाले असून, आता नागपूरजवळ मनसर येथील स्मारकाचे संरक्षक कोटिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.- श्रीकांत मिश्रा, पश्चिम क्षेत्र उपअधीक्षक, रसायन शाखा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराtourismपर्यटन