शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:28 IST

तौउते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले.

ठळक मुद्देयेलदरी जलाशयाच्या परिसरात आढळला दुर्मीळ ‘छोटा चोर’दुर्मीळ ‘छोटा चोर’ या पक्षाची मराठवाड्यातील पहिली नोंद ‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी घेतली धाव

- विजय चोरडियाजिंतूर (परभणी )  : समुद्र काठावर आढळणारा ‘छोटा चोर’ कावळा ‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी येलदरी धरणाच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी भटकंती करताना आढळून आला. या पक्ष्याची नोंद पक्षीमित्र गणेश कुरा यांनी २१ मे रोजी घेतली आहे. तौउते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा. मराठवाड्यात पहिल्यांदाच हा कावळा आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.

हा नेहमीपेक्षा वेगळा पक्षी येलदरी धरणाच्या जलाशय परिसरात उडत असताना पक्षी निरीक्षकांना दिसला. ई-बर्डच्या नोंदीनुसार भारतात या पक्ष्याच्या खूप कमी नोंदी आहेत. मराठवाड्यातील ही पहिलीच नोंद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाची नोंद झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. तौउते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले. या पक्षाचे मराठी नाव ‘छोटा चोर कावळा’ असून, फ्रिगाटे बर्ड कुटुंबातील फ्रेगेटिडाईच्या कुळातील हा समुद्री पक्षी आहे. सुमारे ७५ सें.मी. (३० इंच) लांबीची, ही फ्रिगेटबर्डची सर्वांत लहान प्रजाती आहे. हा पक्षी भारतीय आणि प्रशांत महासागराच्या, तसेच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्‍यावरील उष्ण कटिबंधीय वातावरणात वास्तव्यास असतो.

छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरी- काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नरला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते आणि जोडीदारास आकर्षित करण्यासाठी तो त्यास फुगवितो. मादी नरापेक्षा किंचित मोठी आहे. फ्रिगेट बर्ड्स समुद्राच्या पृष्ठभागावरून उडणारे मासे खातात. नरांच्या वरच्या पंखांवर फिकट गुलाबी पट्टीदेखील असते. मादीच्या डोळ्याभोवती एक लाल रंगाचे वलय असते. किशोर आणि अपरिपक्व पक्ष्यांना ओळखणे अधिक कठीण आहे. फ्रिगेट पक्षी उडण्यासाठी तयार झालेले असावेत. ते क्वचितच पोहतात आणि कमी चालत असतात. हे पक्षी झाडांमध्ये घरटे बांधतात. झाडे आणि झुडपांभोवती सुरक्षित ठिकाणी पिलांचे संगोपन करतात. ते वजनाने अतिशय हलके असतात.

मराठवाड्यातील पहिलीच नोंद२१ मे रोजी सकाळी येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसला. या पक्षाचे त्वरित फोटो घेतले. त्याची अधिक माहिती तपासली असता भारतात या पक्ष्याच्या ई-बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. मराठवाड्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे गणेश कुरा यांनी सांगितले.

पक्षीमित्रांसाठी पर्वणीमहाराष्ट्रात या समुद्र पक्ष्याच्या ५ ते ६ नोंदी आहेत. तौउते वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येलदरी जलाशयाच्या परिसरात आला असावा. पक्षीमित्रांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. येलदरी धरण परिसरात नेहमीच नवनवीन पक्षी येत असल्याने पक्षीमित्रांसाठी ही पर्वणी ठरत आहे.- अनिल उरटवाड, पक्षीमित्र

टॅग्स :environmentपर्यावरणparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद