शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने परप्रांतीय नोकरदार तरुणीवर अत्याचार; छत्तीसगड येथील गुन्हा औरंगाबादेत वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 20:06 IST

क्रारदार पीडितेने याविषयी छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देछत्तीसगड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून हे प्रकरण तपास करण्यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांकडे वर्ग केले.

औरंगाबाद: नोकरीनिमित्ताने शहरात राहणाऱ्या परप्रांतीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, पीडिता आणि आरोपी यांनी यापूर्वी शहरातील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत.

अतिक सिद्दीक मोतीवाला ( रा. मेमननगर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार पीडितेने याविषयी छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. छत्तीसगड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून हे प्रकरण तपास करण्यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांकडे वर्ग केले. सातारा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

पीडितेच्या तक्रारीनुसार, नोकरीनिमित्ताने ती २०१४ ते २०१६ या कालावधीत औरंगाबादेत राहत होती तेव्हा आरोपी अतिकसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाली. ५ एप्रिल २०१५ रोजी अतिक रेल्वेस्टेशन परिसरातील पीडितेच्या फ्लॅटवर गेला. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्यांच्यात अनेकदा संबंध आले. पीडितेने लग्नासाठी आग्रह धरला असता आरोपीने टाळाटाळ केली. यादरम्यान अतिक विवाहित असल्याचे पीडितेला समजले. २०१८ मध्ये पीडिता सुरत येथे नोकरीसाठी गेल्यावर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादला बोलावून घेतले. अतिकने तिच्याकडून पैसे नेले, मात्र परत केले नसल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. २० नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने अत्याचार केल्याचे नमूद केले. त्याच्याकडे तिचा व्हिडिओ आणि छायाचित्र आहेत. हे छायाचित्र आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. पीडिता तिच्या गावी गेली. तेथे तिने अतिकविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद