शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास आणि दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:35 IST

१४ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा किरण रमेश मुजमुले याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (दि. १५ जुलै) दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा किरण रमेश मुजमुले याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (दि. १५ जुलै) दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.१९ डिसेंबर २०१२ रोजी सदर मुलीला तिच्या वडिलांनी शाळेत सोडले होते. तेव्हापासून मुलगी तिच्या आईच्या दागिन्यांसह बेपत्ता झाली होती. सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी पैठणला गेली असता, किरण रमेश मुजमुले (२२, रा. भगूर, ता. शेवगा, जि. नगर) याने तिच्या शेजारी बसून परीक्षा दिली होती. तेव्हापासून तो मुलीच्या संपर्कात होता. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी आरोपी मुलीच्या घरी आला होता. तेव्हा ‘मुलीला वाईट वळण लावू नको’असे फिर्यादी व त्यांच्या पत्नीने आरोपीला समजावून सांगितले होते. त्यावेळी ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे’ असे बोलून तो निघून गेला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी मुलगी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती.फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीने मुलीला अहमदनगर, झाशी, वाराणसी येथे नेल्याचे व तेथे दोघे लॉजवर थांबल्याचे स्पष्ट झाले. वाराणसीहून ते दिल्लीला गेले. २४ डिसेंबर २०१२ रोजी रेल्वे सेवा बंद होती म्हणून दोघे रेल्वेस्टेशनवर थांबले होते. मात्र टवाळखोरांनी त्यांना त्रास दिल्यानंतर मुलीने तिच्या भावाला फोन करून सांगितले होते व तिच्या भावाने गाझियाबादमधील त्याच्या मित्राला रेल्वेस्टेशनवर पाठविले होते. त्यानंतर तो मित्र दोघांना आपल्या घरी घेऊन गेला व २७ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी व मुलगी औरंगाबादला पोहोचले.आरोपीने अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिल्यानंतर आरोपीला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीसह भादंविचे कलम ३७६ समाविष्ट करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम ३७६ (२)(आय)(एन) कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय