शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'विशेष निमंत्रण पत्रिके'वरून रावसाहेब दानवेंचे नाव तर कार्यक्रमातून महाविकास आघाडी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:43 IST

हर घर गॅस अभियान प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदार, तसेच खासदार  इम्तियाज जलील यांची पाठ

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये आज सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास हर घर गॅस या अभियान या २ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडले. मात्र, या कार्यक्रमास एमआयएम खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठ फिरवली. तर विशेष निमंत्रण पत्रिकेवरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव गायब असल्याने एकच चर्चा रंगली

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी ऑनलाईन सहभागी झाले. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी केवळ भाजपच्याच आमदारांची उपस्थिती दिसत होती. 

भाजपने या भूमिपूजन कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात चांगलेच शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. प्रत्येक वार्डातून भाजपचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी जात होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर शहरात प्रथमच एवढ्या मोठा कार्यक्रमाचे नियोजन भाजपतर्फे करण्यात आले होते.

हे होते अनुपस्थितकार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री सुभाष देसाई, कॅबीनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावे होती. मात्र, कार्यक्रमास हे सर्व अनुपस्थित राहिले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBhagwat Karadडॉ. भागवतAtul Saveअतुल सावेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद