शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड

By सुमेध उघडे | Updated: December 11, 2020 15:41 IST

Agitation Against Raosaheb Danve in Aurangabad आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहेदेशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन केली. 

शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर गुरुवारपासून आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी रावसाहेब दानवे यांचे जावई तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलकांना पाठिंबा देत जलकुंभावर आंदोलनस्थळी त्यांच्यासोबत जेवण सुद्धा केले.

दानवेंचे कर्तृत्व शून्य रावसाहेब दानने यांचे कर्तुत्व पूर्णपणे शून्य आहे. आधी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आता प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात तसे दानवे पुढे आले आहेत. एखाद्या गावागुंदाप्रमाणे सत्तेच अमरपट्टा असल्यासारखे त्यांचे वर्तन असते अशी टीकाही जाधव यांनी यावेळी केली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabadऔरंगाबाद