शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आडूळजवळ जबरी दरोड्यात १ जन ठार, जखमी चालक कार चालवत आला घाटी रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 12:15 IST

सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर आडूळ गावाजवळील थापटीतांडा येथे काल मध्यरात्री धावत्या कारवर हल्ला करत जबरी दरोडा घालण्यात आला.

पाचोड ( औरंगाबाद ) : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर आडूळ गावाजवळील थापटीतांडा येथे काल मध्यरात्री धावत्या कारवर हल्ला करत जबरी दरोडा घालण्यात आला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात कारमधील एकजण ठार झाला असून दीड लाखाचा मुद्देमाल लुटण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली असून तपास सुरु आहे. 

याबाबत सपोनि महेश आंधळे यांनी सांगितले कि,  एमबी पाटील कन्ट्रक्शनचे साईट इंचार्ज असलेले सिद्धलिंग रामलिंग कोरे  ( ५५ ) हे आपल्या कारने (एमएच- १२-एचएल -३२५६ ) परळी येथून औरंगाबादला येत होते. औरंगाबाद येथील जाधववाडी येथील रहिवासी सुनील प्रभाकर सुरडकर ( ३७ ) हा कार चालवत होता. मध्यरात्री कार राष्ट्रीय महामार्ग- २११ वरील आडूळगावाजवळील थापटी तांडा येथे आली असता रस्त्यालगतच्या डोंगरावरून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक सुरु झाली. अचानक झालेल्या दगडफेकीने कारचालक सुरडकर याने गाडी थांबवली. तेव्हा काही कळायच्या आत बाजूच्या डोंगराआड लपलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी कारवर हल्ला चढवला. कोरे व सुरडकर यांना बेदम मारहाण केली. कोरे यांच्या जवळील रोकड, मोबाईल व सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून नेले. यात गंभीर जखमी झालेले कोरे जागीच ठार झाले तर चालक सुरडकर गंभीर जखमी आहेत. मारहाण एवढी अमानुष होती कि घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला आहे. मृत सिद्धलिंग कोरे हे मूळ बीड जिल्ह्यातील धारूरमधील म्हातारगाव येथील रहिवासी असून एमबी पाटील कन्ट्रक्शनचे साईट इंचार्ज होते.  

परिसरात नाकाबंदी घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळा जवळील परिसरात नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान पाचोड पोलीस स्थानकात रोड रॉबरी अँण्ड मर्डरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

जखमी अवस्थेत चालक आला घाटीत मारहाणीत गंभीर जखमी झालेले कारचालक सुरडकर यांनी त्या अवस्थेत मृत कोरे यांना कारमध्ये घेऊन औरंगाबाद गाठले. येथे थेट घाटी रुग्णालयातच त्याने कार थांबवली. त्यांच्यावर येथे उपचार सुरु असून कोरे यांचा मृतदेह सुद्धा घाटी रुग्णालयातच आहे.

टॅग्स :RobberyचोरीAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPoliceपोलिस