शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

विद्यापीठांचे राष्ट्रीय स्तरावर रँकिंग; ‘बामु’ही प्रयत्नशील

By admin | Updated: December 24, 2015 00:01 IST

औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग घोषित करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग घोषित करण्यात येणार आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व संशोधक विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून उत्कृष्ट मानांकन मिळविण्यात आपण यशस्वी होऊ, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘इंटर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’(आय क्वॅक) च्या माध्यमातून आयोजित बैठकीत ते बोलत होते. मंचावर बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ.महेंद्र शिरसाट, ‘आय क्वॅक’ चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची उपस्थिती होती. बैठकीस २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू म्हणाले, आपले विद्यापीठ ग्रामीण स्तरावरील ‘अ’ मानांकन मिळविणारे पहिले विद्यापीठ आहे. मूलभूत संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून आपला हा दर्जा टिकवितानाच नव्या मानांकनातही आपले स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे येत्या २७ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाचा प्रस्ताव संबंधित संस्थेकडे पाठविण्यात येईल. या कार्यक्रमात मानांकनाची पद्धती ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ च्या माध्यमातून डॉ. धारूरकर यांनी सादर केली. ते म्हणाले, मूल्यांकनात ४० टक्के भाग हा संशोधन कार्यावर आहे. तसेच अध्ययन, अध्यापन प्रणालीस ३० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. बाह्य प्रभाव व सर्वसमावेशकता यास १५ टक्के , शैक्षणिक समज व दृष्टिकोन यासाठी १० टक्के तर पदवीधर विद्यार्थ्यांचा दर्जा यासाठी ५ टक्के याप्रमाणे मानांकन करण्यात येणार आहे. येत्या १ एप्रिल २०१६ रोजी सदर मानांकन घोषित करण्यात येणार आहे. डॉ. काळे यांनी प्रास्ताविकात या संस्थेच्या स्थापनेबद्दल व विद्यापीठाच्या तयारीचा आढावा घेतला. तर डॉ. शिरसाठ यांनी या प्रस्तावासाठी भरण्यात येणाऱ्या माहितीबद्दल मार्गदर्शन केले. आगामी काळात जगातील टॉप २०० विद्यापीठांत भारतीय विद्यापीठाचा समावेश मोठ्या प्रमाणात होण्यास हे प्रतिमान पूरक ठरेल, असेही डॉ. शिरसाट म्हणाले.