शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

महापालिका सभेत रणकंदन

By admin | Updated: July 8, 2017 00:41 IST

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी तिजोरीत येण्यापूर्वीच महापालिकेतील राजकीय वातावरण शुक्रवारी बरेच तापले. सर्वसाधारण सभेत निधी आणण्याचे श्रेय एकट्या भाजपने घेत पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आखला. याला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवून शासनाकडून निधी आणण्यात आमच्या पक्षाचाही तेवढाच वाटा असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सत्ताधारी भाजपने मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना नगरसेवकांनी बहिष्काराचे अस्त्र उपसले. यापुढे भाजपला अजिबात सहकार्य करणार नसल्याची घोषणा करण्यात आली. सेनेसोबत भाजपचे खटके उडताच एमआयएमने १०० कोटींच्या रस्त्यांची यादी द्या, असा आग्रह महापौरांकडे धरला. चीन दौरा रद्द करा, या दोन मागण्यांसाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी चक्क राजदंड पळविला. शेवटी भाजपने गणपूर्ती नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने तीन तास सभा चालविली. १०० कोटी रुपये शासनाकडून मंजूर होताच शहरात भाजपच्या नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी जागोजागी मोठमोठे होर्डिंग लावले. या निधीतून नेमके कोणते रस्ते करण्यात येणार याचा उलगडा भाजप करायला तयार नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सेना-भाजपमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू होती. शुक्रवारी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे यांनी १०० कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे सभापती, भाजप आमदार, महापौर आदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी अनुमोदन दिले.