शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेलं ते वाक्य खूप अप्रतिम; राज ठाकरेंनी सांगितला महाराजांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले होते, ते सांगितलं. 

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंच्याऔरंगाबाद येथील सभेची गेल्या 10 दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. अखेर, आज सायंकाळी 7 वाजता राज यांनी औरंगाबादेतील सांस्कृतिक मैदानात एंट्री करताच एकच जल्लोष झाला. मोठ्या संख्येने लोक सभा ऐकायला उपस्थित होते. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... म्हणत राज यांनी सभेची सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातालीच त्यांनी, जो इतिहास विसरतो त्याच्या पायाखालचा भुगोल सरकतो, असे म्हणत शिवाजी महाराजांच्या काळातील, एकनाथ महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दाखले दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले होते, ते सांगितलं. 

मशिदींवरील भोंग्याचा विषय राज यांनी उचलून धरला होता त्यावरुन, गेल्या 10 दिवसांपासून राज ठाकरेंवर टिका करणाऱ्यांना काय प्रत्युत्तर मिळणार, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद यांच्या इतिहासाची उजळणी औरंगाबादच्या सभेत केली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब 27 वर्षे स्वत:लाच छळल्यासारखं वाटून घेत होता. शिवाजी हा एक विचार होता, हे औरंगजेबाला कळलं होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच एक वाक्य खूप अप्रतिम आहे. आपल्या लोकांच्या अंगात देवी येते, देव येतो, भुतं येतात. बाबासाहेब म्हणाले होते की, ज्यादिवशी शिवाजी नावाचं भूत अंगात येईल, तेव्हा जग पादाक्रांत करू..., असं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं, असा इतिहास राज ठाकरेंनी सांगितला. राज यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार हे नास्तिक आहेत हे मी म्हटलं, पण ते तर त्यांच्याच कन्येनं लोकसभेत सांगितलं होतं, असा पलटवार राज यांनी राष्ट्रवादीवर केला. मी आज शरद पवार यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, असेही राज यांनी म्हटलं.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादSharad Pawarशरद पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज