शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गायब; खरीप पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका ...

ठळक मुद्देदुष्काळाची छाया : ५० टक्क्यांवरच सरासरी, गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे.पावसाळा संपण्यास अवघा दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ५० टक्के पाऊस झाला. त्यात आणखी काही दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ३९४.९१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा केवळ ३४४.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊ स झाल्यामुळे तलाव, नदी, नाले क ोरडेठाक पडले आहेत.गत महिन्यात १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसाने पिक ांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा वरु णराजा रु सल्यामुळे जिल्ह्यातील पिकांवर संकट आले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांवर हंडाभर पाणी घेऊ न सर्जा-राजाची खांदेमळणी क रण्याची वेळ आली.जायकवाडीत गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठाजायकवाडी धरणातील पाणीसाठा यंदा चिंतादायक ठरणार आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही धरणात गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा आहे. आजघडीला केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा हा ५० टक्क्यांखालीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात धरण भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली आणि जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागला होता. जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता असते. लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, असे म्हणून वरच्या धरणातून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.दैनंदिन वापराने घट१ आॅगस्ट रोजी पाणीसाठा 32.25 टक्के होता. त्यानंतर १५ आॅगस्टनंतर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली; परंतु अवघ्या काही दिवसांत पाण्याची आवकही थांबली आहे. पाणीसाठ्यात १ सप्टेंबरपासून किंचितही वाढ झालेली नाही. औरंगाबादसह विविध पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यात येते. धरणात आवक थांबलेली असताना दैनंदिन पाण्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे पाणीपातळीत घट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस