शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा पाऊस; पण...

By साहेबराव हिवराळे | Updated: November 3, 2023 18:38 IST

दुर्गम भागात, कृषी उत्पादकांना पर्वणीच; पण पूर्तता अत्यल्प

छत्रपती संभाजीनगर : महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषिपंपांसाठी ऑनलाइन अर्ज मागवताच ३ लाख ७३ हजार २६६ अर्जांचा पाऊस पडला. त्यांतील ३ लाख १८ हजार ४२४ लाभार्थी परिपूर्ण ठरले; परंतु त्यातील पूर्तता केवळ १४ हजार ७४२ जणांचीच झाली. छत्रपती संभाजीनगरासह जालना, परभणी, हिंगोलीत काही पंप कार्यान्वित झाले आहे. इतर अर्जदार शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

यंदा पावसाचे प्रमाण किरकोळ असल्याने प्रकल्प तळालाच आहेत; परंतु एरव्ही पाणी असूनही विजेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या नाकी दम आणतो. अशा अवस्थेत शासनाने शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजना आणली आहे. त्याचा फायदा एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान, तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर सौरपंप देण्यात येत आहे. त्यामुळे वीज गुल झाल्याने घुसमट होणार नाही आणि केव्हाही ओसाड जमिनीवर कृषी उत्पादन घ्या आणि शेतात सोने पिकवा, असेच पीएम कुसुम पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उद्दिष्ट वाढवून देण्याची गरजऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी, पाहणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष सौरपंप बसविणे अशा विविध चक्रव्यूहांतून जावे लागते. पूर्तता अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी भगवान गायकवाड, सुभाष पाटील-पांडभरे यांनी केली आहे.

एकच सौरपंप घेता येतो...अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरू नयेत. अधिकचे अर्ज रद्द होईल. एकाच सौर कृषिपंपासाठी अर्ज करावा.- विनोद सिरसाट, जीएम, सौर महाऊर्जा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद