शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कुठे पाऊस, तर कुठे ऊन; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:43 IST

मोठ्या पावसाची सर्वानांच प्रतीक्षा

औरंगाबाद : मराठवाड्यात अनेक भागात बुधवारी पावसाच्या सरी बरसल्या, तर काही जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. शनिवारपासून पाऊस होत असला, तरी शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये सरासरी २़७९ मिमी पाऊस झाल्याची नोंद बुधवारी सकाळी महसूल विभागाकडे झाली आहे़ सेलू तालुक्यात मात्र पाऊसच झाला नाही़ 

लातूर शहरात बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. १५-२० मिनिटे बरसलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान, या पावसाने शेती कामांना सुरुवात झाली असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

हिंगोली शहरातील काही भागात दुपारी २ वाजता हलक्या सरी बरसल्या. तर वसमत येथे अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बासंबा व कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, नांदापूर या ठिकाणी सायंकाळी पाऊस झाला.

नांदेड शहरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती़, तर मुदखेडात तासभर पाऊस झाला़ 

भोकरदनमध्ये मनसोक्त बरसलाबुधवारी भोकरदनसह दानापूर परिसरात सुमारे पाऊण तास  संततधार पाऊस सुरू होता. दानापूर येथे घरात घुसलेले पाणी टोपल्याने काढून अन्नधान्य तसेच इतर संसार उपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या. ज्यांच्या घरात हे पावसाचे पाणी शिरले. यात माजी उपसरपंच बालाजी पवार, नामदेव दळवी, अमोल पावर, रशीद शेख , रामराव दळवी, देविदास पवार, चंद्रकांत पवार, पुसाबाई सोनुने यांचा समावेश आहे. दरम्यान, जालना शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती