शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर रेल्वेस्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:41 AM

औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. एन-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. एन-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे.या श्रेणीत समावेश झाल्यास अधिक गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी सांगितले.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत डॉ. सिन्हा यांनी ही माहिती दिली. ‘ए’ श्रेणीत असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला. यामध्ये पहिल्या टप्प्यात रेल्वेस्टेशनची नवीन इमारत उभी राहिली. दुसºया टप्प्यात जुन्या रेल्वेस्टेशनचा विकास केला जाणार आहे.रेल्वेस्टेशनवर सध्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर लिफ्ट आणि सरकता जिना आहे. त्याबरोबरच मोफत वायफायची सुविधा आहे. ८ ते ६० कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या रेल्वेस्टेशनचा समावेश ‘ए’ श्रेणीत केला जातो. तर ६० कोटींवर उत्पन्न असलेल्या स्टेशनचा ए-१ श्रेणीत समावेश होतो. औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे उत्पन्न सध्या वार्षिक सुमारे ५० ते ५५ कोटी रुपये आहे. त्यामुळे मॉडेल रेल्वेस्टेशन आता ए-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी दरवाजा ठोठावत आहे. त्यासाठी केवळ ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे. या श्रेणीत रेल्वेस्टेशनचा समावेश करण्याचे ध्येय ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे असल्याचे डॉ. सिन्हा म्हणाले.