शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 23:10 IST

छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी मोठं घबाड सापडलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबी पथकाने अटक केली आहे.उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल ४१ लाखांची मागणी केली होती. यापूर्वी या प्रकरणात २३ लाख रुपये त्यांची घरीही पोहोचले आहेत. पुढं त्यांनी आणखी १८ लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली. अखेर या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली.

अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं आहे. त्यामध्ये, तब्बल ५० लाख रुपयांचे सोनं आहे. ५९ तोळे सोनं एसीबीने जप्त केलं आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी धाड टाकून लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली. तक्रारदाराकडे मागणी केलेल्या १८ पैकी ५ लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला रंगेहात ताब्यात घेतले.

घरात मोठं घबाड सापडलं

एसीबीने खिरोळकर यांच्या घरातून तब्बल १३ लाख ६ हजार ३८० रुपयांची रोकड, ५९ तोळे सोन्याचे दागिने. तसेच, ३ किलो ५५३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत ३ लाख ३९ हजार ३४५ रुपये एवढी आहे. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  

तक्रारदाराला वर्ग २ ची जमीन वर्ग १ करायची होती. आणि याच करिता निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करून देण्यासाठी ४१ लाख रुपये मागितले होते. त्यातील २३ लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते.    

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण